धुळ्यात मध्यरात्री LCB ची मोठी कारवाई; 500 किलो गांजा जप्त.
प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव धुळे
धुळे शहरातील पवन नगर (हुडको) परिसरात स्थानिक गुन्हे शाखा (LCB) व चाळीसगाव रोड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल 500 किलो गांजा जप्त केला. मध्यरात्री गोपनीय माहितीच्या आधारे ही धाड टाकण्यात आली. एका घरात मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसराला वेढा घालून संशयित घराची झडती घेतली असता, घरामध्ये सापडलेल्या गोण्यांमध्ये गांजाचा मोठा साठा आढळून आला. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून, जप्त केलेल्या गांजाची बाजारपेठेत मोठी किंमत असल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, हा साठा कुठून आला व कुठे जाणार होता याचा तपास पोलीस करत आहेत.
या कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे,













