शेवगाव येथील खरेदी विक्री संघाच्या व्यापारी संकुलाचा भुमिपुजन सोहळा संपन्न

शेवगाव येथील खरेदी विक्री संघाच्या व्यापारी संकुलाचा भुमिपुजन सोहळा संपन्न

अहील्यानगर जिल्ह्य़ातील शेवगाव येथे दि. 20 मार्च रोजी सविस्तर वृत्त असे की दिनांक 19 मार्च गुढीपाडव्यानिमित्त शेवगांव शहरातील क्रांती चौकातील तालुका खरेदी विक्री संघाचे स्व. मारुतरावजी घुले पाटील व्यापारी संकुल व खरेदी विक्री संघाच्या इमारत कार्यालयाच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. भूमिपूजन स्व. मारूतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मा. आमदार डॉ. नरेंद्र घुले पाटील यांच्या हस्ते व अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ.क्षितिज घुले पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन मिलिंद गायकवाड यांनी केले त्यांनी खरेदी विक्री संघाचे चार माजली भव्य इमारत होत असुन शेवगाव तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील मुलांना प्राधान्याने व्यवसाय करण्यासाठी 22 गाळे उपलब्ध करून दिले जाणार आहेत असे सांगितले.तसेच आभार प्रदर्शन संजय कोळगे यांनी केले यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना चंद्रशेखर घुले पाटील यांनी येत्या 31 मार्च रोजी शेवगांव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास जेष्ठ नेते काकासाहेब नरवडे, अरुण पाटील लांडे, संजय कोळगे, कैलास नेमाने, ताहेर पटेल शिवाजीराव भुसारी सुरेश नाना मडके सुधाकर लांडे, भारत मोटकर, मिलिंद गायकवाड, विजयराव देशमुख, विक्रांत पाटील लांडे, तुषार लांडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ व खरेदी विक्री संघाचे सर्व संचालक मंडळ, नगरपरिषदेचे सर्व आजी माजी नगरसेवक,आणि सर्व संस्थांचे पदाधिकारी तसेच अधिकारी,कर्मचारी, नगरसेवक कार्यकर्ते ग्रामस्थ शेतकरी बांधव आदी उपस्थित 

अहील्यानगर जिल्हा प्रतिनिधी पत्रकार प्रविण भिसे 

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा . 👉 विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा 👉 रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर