निरगुडी गावातील दलित वस्तीशेजारील संरक्षणभिंतीची उंची वाढवून देण्याची नागरिकांची प्रशासनाकडे मागणी.

फलटण प्रतिनिधी:  निरगुडी गावातील होलार व बौद्ध वस्ती शेजारी मंजूर झालेल्या संरक्षण भिंतीचे काम सुरू आहे. लवकरच काही दिवसांत हे काम पूर्ण होईल.

              सध्याची मंजूर झालेल्या संरक्षण भिंतीची उंची ३मीटर इतकी आहे.

                  परंतु वस्ती शेजारील परिस्थिती पाहता ही उंची खूप कमी आहे. 

                                पावसाळ्यामध्ये पाण्याची पातळी खुप मोठी असते. त्यामुळे पावसाळ्यात दलित वस्तीमध्ये पाणी शंभर टक्के घुसणार आहे. त्यामुळे आठ ते दहा घरे पुर्ण पाण्याखाली जाणार आहेत. महिला -पुरुष-लहान मुले-जनावरे यांचे जीविताला शंभर टक्के धोका आहे. 

                  येणाऱ्या 2026 मधील पावसाळ्यात निरगुडी गावातील अनुसूचित जातीतील होलार व बौद्ध वस्तीतील जिवीत व वित्त हानी टाळण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत वाढीव २ मीटर उंच भिंत बांधून देण्याशिवाय पर्याय नाही.

               त्यामुळे सदर काम सुरू असलेल्या संरक्षण भिंतीच्या कामाची पाहणी करून भिंतीची उंची २मीटर इतकी वाढवून देण्यात यावी. 

         अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोरे, देवराज गोरे, अजित गोरे, आदेश गोरे,लहु गोरे यांनी उप अभियंता सातारा जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग फलटण,प्रांतअधिकारी, तहसील कार्यालय, पंचायत समिती फलटण येथे देण्यात आले.

        यावेळी सदर संरक्षण भिंतीची उंची तेथील पाण्याची पातळी लक्षात घेता कमी आहे. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत दलित वस्तीतील नागरिकांची जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी उंची वाढवणे गरजेचे आहे.

       यासाठी लवकरच जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आमदार, खासदार, पालकमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देणार असल्याचे महेंद्र गोरे यांनी सांगितले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal