मुख्याधिकाऱ्यांनी स्वतःच्या खुर्चीत बसवून केला सन्मान !फलटण नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी मुस्ताकअहमद महात साहेब सेवानिवृत्त; आई-वडिलांच्या डोळ्यात तळले आनंदाश्रू

मुख्याधिकाऱ्यांनी स्वतःच्या खुर्चीत बसवून केला सन्मान !फलटण नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी मुस्ताकअहमद महात साहेब सेवानिवृत्त; आई-वडिलांच्या डोळ्यात तळले आनंदाश्रू

फलटण : फलटण नगरपरिषदेचे कर्मचारी तथा उपमुख्याधिकारी म्हणून प्रदीर्घ काळ कारभार सांभाळणारे मुश्ताकअहमद अब्दुललतिफ महात (महात साहेब) काल शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनिमित्त नगरपरिषदेत भावपूर्ण सत्कार सोहळा पार पडला.

यावेळी मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी महात साहेबांना स्वतःच्या खुर्चीवर बसवून विशेष सन्मान केला. लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनीही त्यांचा यथोचित गौरव करत नगरपालिकेतील अनेक जुने प्रसंग आणि त्यांच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला.

महात साहेबांच्या सेवाजिवनातील एक हृदयस्पर्शी वैशिष्ट्य म्हणजे—ज्या आई-वडिलांच्या समोर त्यांनी शासकीय सेवेत रुजू होताना पाऊल ठेवले, त्याच आई-वडिलांच्या उपस्थितीत त्यांनी निवृत्तीचा सत्कार स्वीकारला. या क्षणी महात साहेब व त्यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. कार्यक्रमाला त्यांची नातवंडेही उपस्थित होती, त्यामुळे वातावरण अधिकच भावुक झाले.

नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात साहेबांचा विशेष सत्कार केला. प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या भावना व्यक्त करत त्यांच्या संयमी, कर्तव्यदक्ष आणि सर्वसमावेशक कार्यशैलीचे कौतुक केले. अनेक वर्षे प्रशासनाचा कारभार सुरळीतपणे सांभाळताना त्यांनी दाखवलेली कार्यतत्परता व समन्वयक वृत्ती यांचा विशेष उल्लेख करण्यात आला.

महात साहेबांच्या निवृत्तीने नगरपरिषदेतील एक अनुभवी आणि समर्पित अधिकारी कार्यमुक्त झाला असला, तरी त्यांच्या कार्याची आठवण आणि प्रशासनातील योगदान दीर्घकाळ स्मरणात राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

समाज बांधव-भगिनींसह सायकल वारीतील सायकलस्वारांनी धरला विठ्ठलनामाच्या गजरात नृत्याचा ठेका; क्रांतिसिंह नाना पाटील चौकात फटाक्यांची आतषबाजी, शाल-श्रीफळ व पुष्पहार देऊन सायकलस्वारांचा सन्मान!

दिनदर्शिकांमध्ये बाळशास्त्री जांभेकरांच्या तीन महत्त्वाच्या दिवसांची अचूक नोंद प्रसिद्ध व्हावी ; महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांचे दिनदर्शिका प्रकाशकांना आवाहन

दुर्गम भागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. निमजे यांचे बडतर्फी प्रकरणी उच्च न्यायालयात 👉 उच्च न्यायालयाने राज्य शासनासह गडचिरोली जिल्हा परिषदेला बजावली नोटीस 👉 जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिंदेचे प्रताप चव्हाट्यावर?

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal