छत्रपती शाहू महाराजांचा पूर्णकृती पुतळा उभारण्यात यावा या मागणीसाठी नगरपालिका प्रशासनास निवेदन
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :-
शहरात छत्रपती शाहू महाराजांचा पूर्णकृती पुतळा उभारण्यात यावा या मागणीसाठी छत्रपती शाहू महाराज मराठा समाज परिवर्तन मंडळा तर्फे नुकतेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांना लेखी निवेदन देण्यात आले, पुतळा उभारण्यासाठी समाज मंडळाने शहरातील काही जागा सुचविण्यात असून त्या पैकी नगरपालिका प्रशासनाने शासकीय नियमानुसार पुर्तता करून एका जागेची निवड करावी. असे निवेदनात नमूद केले आहे. आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नातून नुकतेच महात्मा फुलेचे स्मारक झाले, डाॅ. बाबासाहेबांचे स्मारक आधी पासूनच शहरात आहे. तर नव्याने रेल्वे स्टेशन परिसरात बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात यावा ही देखील मागणी आंबेडकर प्रेमींनी लावून धरली आहे. अशातच छत्रपती शाहू महाराजांचा पुर्णाकृती पुतळा शहरात उभारला तर निश्चितच शाहू, फुले, आंबेडकर या चळवळीला, महापुरुषांना न्याय मिळेल आणि यामाध्यमातून समता, बंधुभाव टिकून ठेवण्यासाठी मदत होईल.
आणि आजच्या नवतरुण पिढीला या महापुरुषांचा आदर्श घेता येईल. मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी आणि आमची मागणी प्रशासन स्तरावर पोहचुन शहरात छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा, मागणी मान्य न झाल्यास आम्हाला भविष्यात जन आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे. या वेळी मंडळाचे उपाध्यक्ष गुलाबराव गायके, सचिव माणिक गुंजाळ, सदस्य अशोकराव जगताप, रमेश गोल्हार, सुखदेव निकुंभ, नंदकिशोर जाधव, दगाजी गुंजाळ, चंद्रकांत मराठे, विजय बिडे, हिम्मतराव एरंडे, हिरामण शिंदे, भिमराव शेळके, बी.के. मुलमुले, शिवाजी आखाडे, नामदेव तुपे यांच्यासह शाहू प्रेमी समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.













