चाळीसगाव नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 17 ब मधून शिवसेनेचे शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार योगेश मोरे यांना मतदारांचा वाढता पाठिंबा

(चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) : – 

येथील सर्वांना सुपरीचित दैनिक दिव्य प्रेरणाचे संपादक महाराष्ट्र मराठी संपादक पत्रकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष, तरुण तडफदार समाजसेवक प्रभाग क्रमांक 17 ब मधून शिवसेनेचे शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून योगेश अशोक मोरे नगरपालिकेची 2025 पंचवार्षिक निवडणूक लढवीत आहे. प्रभाग क्रमांक 17 ब मधील मतदार बंधू भगिनींच्या कायम संपर्कात राहून योगेश मोरे यांनी नेहमीच प्रभागातील सार्वजनिक विकासाबाबत आवाज उठवून त्याचा पाठपुरावा केला आहे. प्रभागातील माता-भगिनींसाठी लाडकी बहीण योजनेसाठी जनजागृती करून अनेक माता भगिनींचे अर्ज भरण्यापासून सहकार्य करून त्यांना लाभ मिळवून दिला आहे. योगेश मोरे यांनी शैक्षणिक क्षेत्रातही भरीव काम केले आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी दरवर्षी प्रश्नमंजुषा सारख्या स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन आकर्षक बक्षीसे दिली आहेत. शासन प्रशासनाचा त्यांना दांडगा अनुभव असल्याने प्रभागातील मतदारांची तहसील कार्यालयातील, भूमी अभिलेख कार्यालय, पोलीस स्टेशन, नगरपालिका कार्यालय संबंधातील कामे आजही सातत्याने करीत आहेत. मतदारांच्या कुठल्याही समस्या सोडविण्यासाठी योगेश मोरे यांनी वेळप्रसंगी अधिकारी वर्गाशी वाद घालून समस्यांचे निराकरण केले आहे. स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार प्रभाग क्रमांक 17 ब मधून निवडणूक रिंगणात उतरल्याने प्रभागातील मतदार राजाला आनंद झाला आहे. प्रभाग क्रमांक 17 ब मधील माता भगिनींनी स्वतः योगेश भाऊंच्या प्रचाराची धुरा सांभाळून विरोधकांचे धाबे दणाणले आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. योगेश भाऊंच्या उमेदवारीने भल्या -भल्या उमेदवारांनी धसका घेतला आहे. योगेशभाऊ यांनी होम टू होम प्रचार करण्यावर भर दिला आहे. पक्ष प्रमुख उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी माझी उमेदवारी असून मी आपल्या प्रभागाचा विकास आणि मतदार राजाच्या सर्वसाधारण सुखसोयी, मूलभूत हक्क व समस्यांचे निराकरण करून आपल्या सेवेसाठी कायम हजर राहणार असल्याचे मतदार राजाला विश्वास देत असल्याने योगेशभाऊंना प्रभाग क्रमांक 17 ब मधून मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें