सौ जयश्री रणजीत भुजबळ फलटण नगरपालिकेची निवडणूक अपक्ष लढवणार .

फलटण प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( अ.प.) फलटण तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष श्री रण जीत भुजबळ यांच्या पत्नी सौ. जयश्री रणजीत भुजबळ या भाजपा राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने फलटण नगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक दहा मधून अपक्ष निवडणूक लढविण्यात येणार आहे असे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले.
फलटण नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारांची चाचप णी चालू असताना सौ. जयश्री रणजीत भुजबळ यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत राष्ट्रवादी पक्षाकडे प्रभाग क्रमांक दहा मधून आपल्यासाठी उमेदवारी मागितली होती. परंतु उमेदवारी नाकारल्यामुळे आता अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
त्यांचे पती श्री रण जीत भुजबळ हे फलटण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फलटण तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष असून पक्षांमध्ये नेहमी सक्रिय काम करत आहेत. मागील लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीपासून पक्षासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. तसेच फलटण शहरांमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सभासद नोंदणी करताना पण त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. परंतु या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहा मधून त्यांच्या सुविद्य पत्नी सौ जयश्री रणजीत भुजबळ यांना उमेदवारी नाकारल्यामुळे प्रभाग क्रमांक दहा मधील नागरिकांच्या मागणीमुळे नगरपालिकेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal