अझीम मेटकरी आणि कृपाल अहिवळे यांच्यासह रोहन चव्हाण यांचा भाजपा प्रवेश
फलटण. प्रतिनिधी:
फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राजे गटाला धक्कांवर धक्के बसत असून गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये राजे गटाचे कट्टर समर्थक रोहन चव्हाण यांच्यासह अझीम मेटकरी, कृपाल अहिवळे ज्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
यामुळे इथून पुढे आता युवा पिढी घेत असलेल्या निर्णयामुळे राजे गटाच्या युवा फळीला मोठा धक्का बसतोय .
या तिन्ही उद्योजकांनी माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केला
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे फलटण शहराचा रखडलेला विकास मार्गी लावतील व अशा विकास पुरुषाच्या पाठीमागे खंबीर उभे राहणे ही काळाची गरज असल्याची भावना या उद्योजकांनी व्यक्त केली.
Author: AVB Majha
Post Views: 541













