प्रभाग क्र. 1 मधून सामाजिक कार्यकर्ते मंगेश आवळे यांच्या मातोश्री सौ. लक्ष्मी प्रमोद आवळे निवडणुकीच्या रिंगणात!

प्रभाग क्र. 1 मधून सामाजिक कार्यकर्ते मंगेश आवळे यांच्या मातोश्री सौ. लक्ष्मी प्रमोद आवळे निवडणुकीच्या रिंगणात!

फलटण प्रतिनिधी – महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून पहिल्या टप्प्यात राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीतही वातावरण तापू लागले आहे. शहरातील दोन्ही प्रमुख राजकीय गटांमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

फलटण नगरपरिषद प्रभाग क्रमांक 1 मधून राजे गटाकडून सामाजिक कार्यकर्ते मंगेश आवळे यांनी आपल्या मातोश्री सौ. लक्ष्मी प्रमोद आवळे यांची अनुसूचित जाती महिला आरक्षित जागेतून उमेदवारी मिळावी यासाठी मागणी अर्ज राजे गटाकडे दाखल केला आहे.

 गोविंद डेअरी येथे झालेल्या मुलाखतीदरम्यान मंगेश आवळे यांनी शेकडो समर्थकांसह उपस्थित राहून महाराष्ट्र राज्य विधान परिषद मा. सभापती आ.श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली. यावेळी रामराजे यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद चर्चेचा विषय ठरला असून प्रभाग क्रमांक एक मध्ये या घडामोडींना उत्साहाचे स्वरूप आले आहे.

2017 पासून सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या मंगेश आवळे यांनी विविध संघटनांमध्ये नेतृत्वाच्या पदावर काम करत सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे कार्य केले आहे. सोमवार पेठ परिसरातील सामाजिक संघटनेतून त्यांनी कार्याची सुरुवात केली असून त्यांच्या कार्यतत्परतेमुळे तालुक्यात त्यांच्या कामाची छाप आहे.

गेल्या काही वर्षांपासून मंगेश आवळे हे श्रीमंत रामराजे यांच्या निकट संपर्कात असून प्रभाग क्रमांक एकमध्ये राजे गटाची ताकद वाढविण्यात त्यांची मदत झाली आहे.

सर्वसामान्यांसाठी कोणत्याही परिस्थितीत झटून काम करणारा कार्यकर्ता म्हणून मंगेश आवळे यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळेच त्यांच्या मातोश्री सौ. लक्ष्मी प्रमोद आवळे या येणाऱ्या निवडणुकीत उमेदवारी मिळवून मैदानात उतरणार असल्याची चर्चा सध्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये जोरदारपणे सुरू आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें