विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे दसरा निमित्त शस्त्रपूजन सोहळा उत्साहात साजरा
चाळीसगाव प्रतिनिधी : विजयादशमी अर्थात दसरा सणाच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शस्त्रपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाला चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ तसेच सौ. संपदा ताई उमेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीत शस्त्रपूजन करून विजयादशमीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. हिंदू संस्कृतीमध्ये विजयादशमी या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी शस्त्रपूजन करण्याची परंपरा असून, शौर्य, पराक्रम, सामर्थ्य आणि धर्मरक्षणाचा संकल्प या परंपरेतून व्यक्त केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि स्वराज्याच्या विचारांची आठवण करून देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या माध्यमातून विजयादशमीच्या सणाचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमासाठी आयोजकांनी नियोजन केले होते. या शस्त्रपूजन सोहळ्याचे आयोजन भूषण परदेशी, गोविंद आबा सौंदाणे आणि निखिल परदेशी यांनी केले.












