साखरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज या अभियानाच्या अनुषंगाने स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात आले

साखरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज या अभियानाच्या अनुषंगाने स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात आले

साखरवाडी प्रतिनिधी 

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५ स्वच्छ भारत अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ऑक्टो.हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.त्यास अनुसरून स्वच्छता हीच जनसेवा मोहीम राबविण्यात येत आहे.त्या अंतर्गत साखरवाडी ता.फलटण गावामध्ये स्वच्छता श्रमदान अभियानाचे आयोजन करून गावचा परिसर स्वच्छ करण्यात आला.त्यास ग्रामस्थाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जिल्हा परिषद, पंचायत समिती स्वच्छ भारत मिशन ग्रामिण टप्पा २ या मोहिमेचा शुभारंभ साखरवाडी गावामध्ये परिसर स्वच्छतेचा उपक्रम राबवुन करण्यात आला.जि.प.,पं.स.व ग्रामपंचायतीच्या कामगीरीचे मुल्यांकन करून त्यांची कार्यक्षमता वाढविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.या मोहिमेत गावातील रस्ते, शालेय परिसर,सरकारी दवाखाना, बाजार तळ, मंदिरे, अंगणवाडी परिसर,जि.प.शाळा,गटारे, रस्त्यांचे खड्डे बुजवीणे, गावातील अंतर्गत रस्ते मुरुमीकरण करण्यात आले व इतर ठिकाणी साफसफाई स्वच्छता श्रमदान करण्यात आले.त्यास ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.दरम्यान आपले गाव स्वच्छ सुंदर हरित करण्याचे नियोजन करण्यात आले असून आपल्या गावच्या लोकसंख्ये इतकिच देशी उपयुक्त झाडे लावण्याचा मानस गावच्या विद्यमान सरपंच सौ अपर्णा दत्तात्रय बोडरे यांनी व्यक्त केला.या स्वच्छता अभियान राबविण्यास गटनेते माजी सरपंच श्री.विक्रम आप्पा भोसले, जेष्ठ नेते डि.के.पवार ,उपसरपंच श्री विक्रम ढेंबरे,श्री अक्षय रुपनवर, अध्यक्ष श्री मच्छिंद्र भोसले श्री.संग्राम दादा औचरे, श्री.आनंदा जाधव, श्री.गनेश गायकवाड, श्री.विराज यादव,ग्रा.पं.सदस्या सौ.हेमलता भोसले,सौ.गौरी औचरे,सौ.किर्ती भोसले,सौ.सुषमा गाडे, अंगणवाडी सेविका, आशा, प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी, साखरवाडी विद्यालय साखरवाडी चे शिक्षक विद्यार्थी, सरदार वल्लभभाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांचे शिक्षक व विद्यार्थी,महिला बचतगट, गावातील तरुण मंडळे,ग्रामपंचायत अधिकारी श्री.एम.एन.आढाव आणि ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत अभियान राबविण्यात आले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा . 👉 विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा 👉 रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर