ग्रामीण विकास मिशन संस्थेची राज्य कार्यकारिणी जाहीर

ग्रामीण विकास मिशन संस्थेची राज्य कार्यकारिणी जाहीर

ग्रामीण विकासाचे विविध उपक्रम राबवणाऱ्या “ग्रामीण विकास मिशन” या संस्थेची राज्य कार्यकारिणी काल जाहीर करण्यात आली.काल पुण्यात संस्थेचे प्रमुख अधिकराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.

पुण्यातील आरोही फौंडेशनने गावपातळीवर विविध उपक्रम राबवले जावेत यासाठी ग्रामीण विकास मिशन संस्थेची स्थापना केली.त्याला मिळणारा प्रतिसाद बघून हि योजना राज्यभरात राबवण्यासाठी संस्थात्मक बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यानुसार विविध पदाधिकारी नियुक्त करून त्यांना विभागवार जबाबदारी सोपवली आहे. जिल्हास्तरावर प्रतिनिधी नेमण्यात आले आहेत.

ग्रामीण विकास मिशन अंतर्गत प्रामुख्याने शासकीय योजना गावपातळीवर पोहोचवणे, रोजगार निर्मिती व व्यवसाय प्रशिक्षण,कृषी व पशुपालन,शिक्षण,आरोग्य, ग्रामस्वच्छता,जलसंधारण, पाणीपुरवठा आणि पर्यावरण यासारख्या विषयाशी निगडीत उपक्रम राबविण्यास प्राधान्य दिले जाते.सध्या ग्रामपंचायत, सहकारी संस्थांना हाताशी धरून लोकसहभागातून ही कामे केली जात आहेत.

नवीन कार्यकारिणीत 

योगेश खोपडे यांची कार्यकारी संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.प्रशांत श्रोत्री यांच्याकडे शिक्षण विभाग,प्रफुल्ल सावंत यांच्याकडे मराठवाडा प्रकल्प संचालक,आरती सोनावणे यांच्याकडे प्रकल्प समन्वयक,किरण हादवे यांच्याकडे सातारा जिल्हा प्रकल्प प्रमुख, अविनाश गायकवाड यांच्याकडे सांगली जिल्हा प्रकल्प प्रमुख,

मदन पाटील यांच्याकडे कोल्हापूर आणि दादासाहेब पवारज्यांच्याकडे पुणे जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे..

येणाऱ्या काळात “ग्रामीण विकास मिशन” हा उपक्रम व्यापक स्वरूपात संपूर्ण राज्यभर राबविण्याचा संस्थेचा मानस आहे.त्यासाठी शासकीय पातळीवरून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.लवकरच शासनस्तरावर सुरू असलेल्या विविध योजनेत संस्थेला सामावून घेण्यात घेण्यात येणार आहे.अशी माहिती संस्थेचे प्रमुख अधिकराव जगताप यांनी दिली.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें