पिडीतांना न्याय मिळण्यासाठी अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा – गोरक्ष लोखंडे

सातारा  प्रतिनिधी: अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 हा मानवी संरक्षणार्थ असणारा अत्यंत महत्वाचा कायदा आहे. याचा वापर या समाजातील घटकांच्या संरक्षणार्थ प्रभावीपणे झाला पाहिजे. अनुसूचित जाती, जमातीमधील नागरिक प्रशासन, पोलीस आणि शासकीय यंत्रणा यांच्याकडे फार मोठ्या अपेक्षेने पाहत असतात. त्यांना न्याय देणे, त्यांचे संरक्षण करणे हे या व्यवस्थेचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी केले.

येथील शासकीय विश्रामगृहात श्री. लोखंडे यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. यावेळी वाईचे प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे, उप पोलीस अधीक्षक अतुल सबणीस, खंडाळ्याचे तहसीलदार अजित पाटील, समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुनिल जाधव आदी उपस्थित होते.

 वर्षभरात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत जिल्ह्यात दाखल झालेल्या प्रकरणांची माहिती घेऊन श्री. लोखंडे म्हणाले, अनुसूचित जाती, जामतींमधील अन्याय अत्याचग्रस्त पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी यंत्रणांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निप:क्षपातीपणे काम करणे आवश्यक आहे. यावेळी कोरेगाव तालुक्यातील सोनके येथे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मालकीवरुन झालेल्या घटनेबद्दल बोलताना ते म्हणाले, जागेसंबंधाचा वाद ही न्यायप्रविष्ठ प्रक्रिया आहे. तथापी झालेल्या घटनेमुळे जातीय सलोखा बिघडू नये व सलोखा अबाधित रहावा, यासाठी दोषींवर गुन्हे दाखल करुन पिडीतांना न्याय दिला पाहिजे. या घटना स्थळाला महसूल, पोलीस व समाज कल्याण अशा संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ भेट द्यावी व ॲट्रॉसिटी कायद्याची कोटेकोर अंमलबजावणी करावी, असेही श्री. लोखंडे यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी शिरवळ येथील जागे प्रकरणी सुनावणी घेतली. तसेच सदर बाझार येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वास्तव्यास असलेल्या निवास्थानाचीही पहाणी केली. व स्मारकाच्या कामाबद्दल समाजकल्याण अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal