तरडगावच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

तरडगावच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

 

तरडगाव, येथील वेणूताई चव्हाण हायस्कूलच्या दहावी बॅच १९९३-९४ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुसताच उत्साहात झाला. या वेळी जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

 

या मेळाव्यास शिक्षक श्री. लोहार, श्री. मोहिते, श्री. ननवरे, श्री. मदने, सुनील क्षीरसागर, श्री. सस्ते, श्री. रवी भोसले, श्री. यादव, श्री. भिसे, श्री. ठोंबरे आणि श्रीमती शहा उपस्थित होते. त्यांचे माजी विद्यार्थ्यांनी स्वागत केले. काही दिवंगत शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

 

या स्नेहमेळाव्यास एकूण ७६ माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमात विविध प्रकारचे गेम्स, सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले. या वेळी शिक्षकांनीही आपली मनोगते व्यक्त करत सर्व माजी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

*आयुष्यातील अविस्मरणीय क्षण …….*

सौ वेणूताई चव्हाण हायस्कूल तरंडगाव दहावी सन १९९३-९४ गेट टुगेदर ३१ वर्षानंतर अविस्मरणीय क्षण ……..

गेट टुगेदर म्हणजे आपल्या मित्र- मैत्रिणींच्या व सर्व गुरुवर्य शिक्षक वृंद यांच्या नात्यांचा उत्सव, रोजच्या गडबडीत हरवून गेलेल्या गोष्टींना पुन्हा नव्याने आठवण्याची ही संधी. जीवनातील हा एक छोटासा क्षण आपल्याला मोठ्या आठवणी देऊन गेला …….

एकतीस वर्ष खूप मोठा काळ असतो हा खुप बदल झालेत , तब्बल ३१ वर्षांनंतर पुनः शालेय जीवनातील आठवणी ताज्या झाल्या ,

गेट-टुगेदर म्हणजे फक्त एक कार्यक्रम नव्हता , तर आपापसात जिव्हाळ्याचे बंध घट्ट करणारा एक सोहळा होता. आपल्या मित्र- मैत्रिणी कामाच्या व्यापात सर्वजण एकमेकांशी संवाद साधू शकत नाही. पण असे कार्यक्रम आपल्याला एकत्र येऊन गप्पा मारण्याची, आठवणींना उजाळा देण्याची आणि एकमेकांच्या सोबत वेळ घालवण्याची संधी देतात…..

 

गेट-टुगेदर सर्व कार्यक्रम नियोजन बद्ध ठरलाच होता. आपले सर्व जिवलग मित्रांनी फिजिकली वेळ देऊन सहा महिने अगोदर तयारी केली ….

गेट टुगेदर कार्यक्रम म्हणजे आपल्या घरातील जणूकाही लग्न सोहळा असतो तशीच तयारी केली. आपले मित्र म्हणजे सर्व हिरेच जणू ……

ज्ञानेश्वर सुरवात केली आपल्या ग्रुपची, आदेश दादा खूप महत्वाचे काम म्हणजे सर्वाना एकत्रित आणले, तुषार, संतोष, विक्रम , विलास खूपच छान सुसूत्रता कार्यक्रमात योग्य वेळी सर्व सकाळपासून सर्व काही वेळेत आणि सर्वांची व्यक्तिगत माहिती अप्रतिम , आणि तेवढेच सुंदर अँकरिंग आपल्या महेशचे धडकेबाज …..

तसेच दीपक, सचिन, ज्ञानेश्वर, विजय याच्यासह मुलींचाही तेवढाच उत्साह आपणा सर्व जणांना ग्रुप वर व वैयक्तिक चर्चा करून सर्व निर्णय घेतले ……

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व गुरुवर्य शिक्षक वृंद व आपण आपल्या मित्र- मैत्रिणी सर्व वेळेवर हजर ….. 

खरं तर मी लहान मुलासारखाच वागलो त्यादिवशी सर्व काही देहभान विसरून मित्राबरोबर हक्काने ….. 

एक उनाड दिवसच जगलो….. 

खरं तर सर्व काही मनापासून होतं ते कोणताही मुलामा नव्हता त्यात, सर्व काही घडतं होतं .. मनही भरून आलं होतं …. किती बोलावं , काय काय बोलावं … काही काही मनात येईल ते … हक्काने 

आपल्या सवंगड्या सोबत मिळालेला वेळ संपूच नाही ……

आपण आपल्या आयुष्यात सर्व इच्छा पूर्ण करत असतो. तशीच एक होती ही …..

आपल्या आयुष्यात अनेक चढ उतार येतात परंतु मित्रामूळे सर्व काही सुरळीत होते … 

आजच्या या क्षणांमध्ये आपण जुन्या आठवणींना उजाळा मिळाला , काही नव्या आठवणी तयार झाल्या ,

असे क्षण पुन्हा पुन्हा निर्माण करा आणि आपले स्नेहबंध अधिक मजबूत करूयात …..

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें