गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसयटी च्या चेअरमन पदी पुनश्च श्री.सचिन यादव तर व्हाईस चेअरमन पदी योगेश यादव यांची निवड

गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसयटी च्या चेअरमन पदी पुनश्च श्री.सचिन यादव तर व्हाईस चेअरमन पदी योगेश यादव यांची निवड

गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

जिल्ह्यातील सर्व सहकार संस्थेचा संचालक मंडळाचा मागील कार्यकाळ संपुष्टात आलेने सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून सहकारी संस्था निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. असलेने गॅलेक्सी कोऑपरेटिव्ह क्रेडिट संस्थेचा देखील कार्यकाळ संपला असल्याने दिनांक १६/०४/२०२५ रोजी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक माननीय श्री. जे. पी. गावडे साहेब व श्री. शेखर साळुंखे साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली. संस्थेचे संस्थापक चेअरमन माननीय श्री. सचिन बबनराव यादव यांची पुनश्च एकदा चेअरमन पदी एकमताने निवड झाली. व संस्थेच्या व्हाईस चेअरमन पदी माननीय श्री. योगेश रघुनाथ यादव यांची देखील एकमताने व संस्थेचे संचालक पदी श्री. संदीप मोहनराव शिंदे, श्री. गणेश हणमंतराव निकम, श्री. हेमंत बाळासाहेब खलाटे, श्री. अशांत हनुमंत साबळे आणि श्री. संदीप राजू लोंढे यांची देखील सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी निवड झाली; त्याबद्दल सर्व संचालक मंडळ व के. बी. ग्रुप कंपनीचे कर्मचारी व गॅलेक्सी संस्थेचे कर्मचारी यांचे वतीने निर्वाचित सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

के.बी. ग्रुप ऑफ कंपनीचे आदरणीय डायरेक्टर आणि एक यशस्वी उद्योजक माननीय श्री. सचिन बबनराव यादव यांनी के. बी. उद्योग समूहात कार्यरत असणाऱ्या १५०० कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीचा सखोल आणि सकारात्मक अभ्यास करून सर्वसामान्य कर्मचारी यांना जर आर्थिक सहाय्य केल्यास छोट्या मोठ्या व्यवसायातून आपली आर्थिक परिस्थिती सुधारू शकतात. याचा सखोल अभ्यास करून मागील ५ वर्षापासून सहकार क्षेत्रात गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून सुरुवात केली. सुरुवातीस तालुका कार्यक्षेत्र असणारी संस्था अल्पावधीतच तालुक्यातील दोन संस्थांचे गॅलेक्सी संस्थेत विलीनीकरण करून सातारा जिल्ह्याबरोबरच पुणे जिल्हा कार्यक्षेत्र देखील प्राप्त केले व सदरचे दोन्ही जिल्ह्याचे कार्यक्षेत्र प्राप्त झाल्याने शाखा विस्तार करून आज संस्थेच्या एकूण ६ शाखा अद्यावत व सुसज्ज उभारून कार्यान्वित झाल्या आहेत.

संस्था स्थापनेपासून सभासदांना मुदत ठेवीवर रास्त व्याजदर देऊन चालू आर्थिक वर्षात ७५ कोटींचा एकत्रित व्यवसाय करून एक नवीन उच्चांक प्रस्थापित करून जिल्ह्यातील इतर संस्थांपुढे आदर्श ठेवला आहे. त्याचबरोबर सभासदांना उद्योग व्यवसाय वाढीसाठी कर्ज वितरण करून संस्थेचा एन.पी.ए. २% पेक्षा कमी ठेवण्यात संस्थेने यश मिळवले आहे. तसेच सोने तारणास जास्तीत जास्त कर्ज पुरवठा माफक व्याजदर व मशीनद्वारे सोने ऐवजाची शुद्धता तपासून ग्राहकांना १५ मिनिटात कर्ज अदा करण्यात येत असल्याने सभासद ग्राहकांचा संस्थेस उदंड प्रतिसाद मिळत आहे. संस्थेने स्थापनेपासून सभासद हित जोपासून तसेच तत्पर सेवा प्रदान करून आणि सर्व आर्थिक व्यवहार अतिशय पारदर्शक ठेवून चालू आर्थिक सालात माहे – फेब्रुवारी २०२५ मध्ये पिंपरी चिंचवड या ठिकाणी अद्यावत नवीन शाखा स्थापन केली व त्या नवीन शाखेत कुशल अनुभवी तसेच उच्चशिक्षित कर्मचारी पुणे, मुंबई या महानगरीतून ५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संस्थेचे सर्व सभासद ग्राहक सन्माननीय ठेवीदार व कर्जदार यांना अविरत सेवा – सुविधा वेळेत कर्जपुरवठा, ठेवीवर रास्त व्याजदर तसेच सुरक्षितता प्रदान करून आणि एकंदरीतच सर्व आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवून सर्व सभासदांचा अतूट विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे माननीय श्री. सचिन यादव सर यांना केंद्रबिंदू मानून व त्यांचे वर अतूट विश्वास ठेवून संस्थेस सभासदांचा खूप प्रतिसाद लाभलेला आहे. “ गॅलेक्सी म्हणजे विश्वास ” हे ब्रीदवाक्य आचरणात आणून सर्व आर्थिक व्यवहार प्रामाणिक व पारदर्शक ठेवले आहेत.

गॅलेक्सी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड फलटण तालुका फलटण जिल्हा सातारा या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया अध्यासी अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक माननीय श्री. जे.पी. गावडे साहेब व श्री. साळुंखे साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली. संस्थेचे संस्थापक चेअरमन आदरणीय माननीय श्री. सचिन बबनराव यादव यांची पुनश्च एकदा चेअरमन पदी एकमताने निवड झाली व संस्थेच्या व्हॉइस चेअरमन पदी आदरणीय श्री. योगेश रघुनाथ यादव यांची देखील एकमताने सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी निवड झाली. त्याबद्दल सर्व संचालक मंडळ व के बी ग्रुप ऑफ कंपनीचे कर्मचारी यांचे वतीने मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या

.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

समाज बांधव-भगिनींसह सायकल वारीतील सायकलस्वारांनी धरला विठ्ठलनामाच्या गजरात नृत्याचा ठेका; क्रांतिसिंह नाना पाटील चौकात फटाक्यांची आतषबाजी, शाल-श्रीफळ व पुष्पहार देऊन सायकलस्वारांचा सन्मान!

दिनदर्शिकांमध्ये बाळशास्त्री जांभेकरांच्या तीन महत्त्वाच्या दिवसांची अचूक नोंद प्रसिद्ध व्हावी ; महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांचे दिनदर्शिका प्रकाशकांना आवाहन

दुर्गम भागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. निमजे यांचे बडतर्फी प्रकरणी उच्च न्यायालयात 👉 उच्च न्यायालयाने राज्य शासनासह गडचिरोली जिल्हा परिषदेला बजावली नोटीस 👉 जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिंदेचे प्रताप चव्हाट्यावर?

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

समाज बांधव-भगिनींसह सायकल वारीतील सायकलस्वारांनी धरला विठ्ठलनामाच्या गजरात नृत्याचा ठेका; क्रांतिसिंह नाना पाटील चौकात फटाक्यांची आतषबाजी, शाल-श्रीफळ व पुष्पहार देऊन सायकलस्वारांचा सन्मान!

दिनदर्शिकांमध्ये बाळशास्त्री जांभेकरांच्या तीन महत्त्वाच्या दिवसांची अचूक नोंद प्रसिद्ध व्हावी ; महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांचे दिनदर्शिका प्रकाशकांना आवाहन

दुर्गम भागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. निमजे यांचे बडतर्फी प्रकरणी उच्च न्यायालयात 👉 उच्च न्यायालयाने राज्य शासनासह गडचिरोली जिल्हा परिषदेला बजावली नोटीस 👉 जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिंदेचे प्रताप चव्हाट्यावर?