पोलीस अधीक्षक यांनी जिगरबाज पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेंची घेतली भेट

पोलीस अधीक्षक यांनी जिगरबाज पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेंची घेतली भेट

साखरवाडी प्रतिनिधी

साखरवाडी ता फलटण येथे दि १४ रोजी गांजा तस्करांनी सुमारे एक किलोमीटर गाडी बरोबर फरफटत नेऊन सुद्धा जिगरबाज पीएसआय गोपाळ बदने यांनी धैर्य दाखवून गांजा तस्करांची गाडी पकडली होती यामध्ये बदने यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली तरी त्यांनी गाडी न सोडल्याने एक संशयित व १०.३० किलो गांजा पोलिसांना आढळून आला पीएसआय बदने यांच्या या कार्याची दखल घेऊन सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी करून त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली यावेळी बदने यांचे आई-वडील व इतर कुटुंबीय, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस व फलटण ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक उपस्थित होते या भेटीवेळी बदने हे भावनिक झाले प्रतक्ष पोलीस प्रमुख व्यस्त कार्यातून वेळ काढून फलटण ला घरी भेटीला आले त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला वरिष्ठांची कौतुकाची थाप ही पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी संजीवनी असते यामुळे ते सगळी वेदना काही काळ विसरून गेले त्यावेळी त्यांच्या आईला अश्रू अनावर झाल्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें