लोणंद नगरपंचायत हद्दीत झाडांची खुलेआम कत्तल
सातारा प्रतिनिधी आबासो धायगुडे
एकीकडे हजारो कोटी रुपये खर्च करुन दरवर्षी लाखो नव्या वृक्षांची लागवड करण्याची मोहीम शासनाने हाती घेतलेली असताना, दुसरीकडे विकासाच्या नावाखाली जुन्या वृक्षांची विकासाच्या नावाखाली कत्तल लोणंद नगरपंचायत हद्दीतील शेळके वस्ती कडे जाणाऱ्या शिरवळ लोणंद रस्त्यालगत असलेले मटन मार्केट येथील झाडांची खुलेआम कत्तल करण्यात आलेली आहे
लोणंद येथील शिरवळ रोडवर मटण मार्केट येथील मोठमोठ झाडे जमीन दोस्त करण्यात आलेली असून तेथील नागरिकांमधून रोष व्यक्त करण्यात येत आहे.ही जागा लोणंद नगरपंचायत हद्दीतील असून ही झाडे कोणी पाडली आहेत हे वन विभाग अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी ही जागा नगरपंचायतीची आहे तसेच सांगण्यात आले नगरपंचायतला विचारले असता झाडे कोणी पाडली आहेत त्यांना पुर्वकल्पना नसून माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले शासन एकीकडे वृक्ष लागवडीची मोहीम युध्दस्तरावर राबवित असताणा विनापरवाना महाकाय वृक्षाची कत्तल करण्यात आली असल्याने तेथील नागरिकांकडून कमालीची नाराजी व्यक्त केली.











