शिरवळ पोलीस ठाणेची कामगिरी
महिलेच्या माध्यमातून प्रतिष्ठीत डॉक्टरला हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढून १ कोटी रुपयांची खंडणी मागणा-या २ युवकांना शिरवळ पोलीसांनी केले जेरबंद
खंडणी मागणा-यांनो आता सावधान
शिरवळ पोलीस ठाणे हद्दीतील मौजे विंग ता. खंडाळा जि. सातारा येथील क्लिनिक चालविणारे डॉक्टर यांचेशी सलगी वाढवून त्यांनी त्यांचे क्लिनिकमधील महिला कामगार हिचेशी केलेल्या वर्तनाचे संबंधीत महिलेने व्हिडीओ चित्रण केले होते. त्या चित्रिकरणाचा वापर करून व तुमचे वैद्यकिय लायन्संस रद्द करुन तुमची बदनामी करु अशी धमकी फोनवरुन अज्ञात इसमाने डॉक्टरांकडे रु. १ कोटींची खंडणी मागितली.
त्याबाबत अज्ञात खंडणीखोर दिनांक ६ मार्च २०२५ पासून डॉक्टरांना व त्यानंतर त्यांचे पत्नीला मोबाईल संदेश व फोन करून धमकावून खंडणीची मागणी करित होता. त्याबाबत डॉक्टर पती पत्नी हे चिंताग्रस्त झाले. पोलीसांनी खंडणीखोरांबाबत तक्रार द्या असे आवाहन केल्याने डॉक्टर पती पत्नी यांनी मोठ्या धीराने अज्ञात खंडणीखोराविरुध्द तक्रार पोलीस ठाणेत नोंदविली.
या तक्रारीची गोपनीयता ठेवून मा. पोलीस अधिक्षक सातारा, मा. अपर पोलीस अधिक्षक सातारा व उपविभागीय पोलीस अधिकारी मा. राहूल धस यांनी त्याचा सखोल अभ्यास करून खंडणीखोरास जेरबंद करणेसाठी आवश्यक सुचना व मार्गदर्शन केले. त्या सुचनेनुसार आम्ही पोलीस निरिक्षक यशवंत नलवडे व महिला सपोनि किर्ती म्हस्के, सपोनि महादेव शिद, पोउपनि सपना दांगट, व पोलीस अंमलदार पोहवा प्रशांत धुमाळ, पोकाँ सुरज चव्हाण, पोकाँ अजित बोराटे पोकाँ भाऊसाहेब दिघे, पोकाँ अरविंद बा-हाळे, मपोकाँ स्नेहल शिंगटे, निलिमा भिलारे, होम. संतोष इंगवले यांना एकत्र करुन करावयाचे कारवाई बाबत आवश्यक सुचना दिल्या.
त्यानंतर डॉक्टर यांचे पत्नी यांचेकडील मोबाईलवर खंडणीखोराकडून आज खंडणी रु. १ कोटी घेवून रामेश्वर मंदिर शिरवळ परिसरात येण्याचा संदेश दिला. त्या परिसरात वर नमुद पोलीस अधिकारी व स्टाफ यांना कारवाईचा सापळा रचून दिलेली कामगिरी पार पाडण्यास सांगितले.
ठरल्याप्रमाणं आज दिनांक १५/३/२०२५ रोजी चे दूपारचे सुमारास डॉक्टर यांचे पत्नी खंडणीखोरास द्यावयाची रक्कम घेवून रामेश्वर मंदिर परिसरात हजर असताना एका मोटारसायकलवरुन डबलशीट दोन इसम त्यांचेकडे खंडणीची रक्कम घेण्यासाठी आले. त्यांनी वैद्यकिय अधिकारी यांचे पत्नीशी बातचित करून खंडणीची रोख रक्कम ठेवलेली पर्स ताब्यात घेवून खंडणीखोरांनी पर्समधील रकमेची पाहणी केली. त्यांचा खंडणीची रक्कम पाहून खंडणी मिळाल्याची खात्री झाल्याने खंडणीखोर पर्स घेवून निघून जाण्याचे तयारीत असताना जवळच लपलेल्या पोलीसांनी त्या दोघांना ताब्यात घेवून त्यांचेकडील खंडणीची रोख रक्कम असलेली पर्स ताब्यात घेतली. खंडणीखोरांकडे त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी आपले नाव १) नितिन नवनाथ प्रधान वय २० वर्ष मुळ रा. कारी ता. माजलगाव जि. बीड हल्ली रा. शिंदेवाडी ता. खंडाळा जि. सातारा २) दत्ता आप्पाराव घुगे वय २४ वर्ष मुळ रा. कासारगाव ता.जि. लातूर हल्ली रा. शिंदेवाडी ता. खंडाळा जि.सातारा अशी माहिती दिली. वरील नमुद आरोपीतांकडून खंडणीची रक्कम ठेवलेली पर्स, मोटारसायकल, मोबाईल, सिमकार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास सुरु आहे.
मागणी करणा-यां विरुध्द नागरिकांनी निर्भयपणे पोलीस ठाणेस येवून तक्रार नोंदवावी आपले नाव गुपित ठेवून खंडणीखोरांवर कठोर कारवाई होईल
तरी खंडणीची
असे आश्वासन पोलीसांकडून देण्यात येत आहे. सदर कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे मा. समीर शेख भापोसे पोलीस अधिक्षक सातारा, श्रीमती. डॉ. वैशाली कडूकर अपर पोलीस अधिक्षक सातारा, श्री राहूल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांनी अभिनंदन केले.
–













