संत ज्ञानदेव पुरस्कार मिळाल्याबद्दल ह.भ.प. संजय महाराज यांचा क्षत्रिय मराठा समाजाच्या वतीने सत्कार

संत ज्ञानदेव पुरस्कार मिळाल्याबद्दल ह.भ.प. संजय महाराज यांचा क्षत्रिय मराठा समाजाच्या वतीने सत्कार

(चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :-  

वारकरी संप्रदाया मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील किर्तनकारांचा राज्य शासनातर्फे दरवर्षी संत ज्ञानदेव पुरस्कार देण्यात येतो. बुलढाणा येथील ह.भ.प. संजय महाराज पाचपोर यांना त्यांनी वारकरी संप्रदाया बरोबर सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल २०२४ चा संत ज्ञानदेव पुरस्कार राज्य शासना तर्फे प्रदान करण्यात आला. त्याबद्दल त्यांचा चाळीसगाव येथे काल क्षत्रिय मराठा समाजाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. संत तुकाराम महाराज बीज निमित्त चाळीसगाव येथे सुरू असलेल्या कीर्तन सप्ताहात ह.भ.प. संजय महाराज यांची आज किर्तन सेवा होती. याचे औचित्य साधून त्यांचा काल दि.१३ रोजी चाळीसगाव येथील क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष बंडू नाना पगार यांनी त्यांचा कीर्तन संपल्यावर जाहीर सत्कार केला. दरम्यान महाराजांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें