डीसीसी बँकेतील कर्मचाऱ्यांची पगारवाढ,नूतनीकरण, तात्काळ करावे;खा.श्री.छ.उद्यनराजे

डीसीसी बँकेतील कर्मचाऱ्यांची पगारवाढ,नूतनीकरण, तात्काळ करावे;खा.श्री.छ.उद्यनराजे

नाबार्डसह अन्य शिखर संस्थांनी सातत्यपूर्ण नावाजलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रगतीमध्ये बँकेच्या सर्व कर्मचा-यांचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेवून, कर्मचा-यांच्या पगारवाढीचा जरुर तो करारनामा तातडीने करावा, फिनॅकल सॉफटवेअरमुळे निर्माण होत असलेल्या तक्रारींबाबत योग्य उपाययोजना कराव्यात, अन्यथा आम्हाला वेगळा पवित्रा घ्यावा लागेल असा सूचक परंतु गर्भित इशारा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी डिसीसी बँकेच्या व्यवस्थापन आणि प्रशासनाला दिला आहे..

याबाबत खासदार तथा सातारा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचाजक श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्हामध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविलेल्या पत्रनिवेदनात नमुद केले आहे की, बँकेच्या यशस्वी वाटचालीत कर्मचा-यांचे फार मोठे योगदान आहे. बँकेच्या कर्मचा-यांच्या पगाराबाबतचा करारनाम्याची मुदत दिनांक 31/03/2024 रोजी संपलेली असून, पगारवाढीसह पगाराबाबतच्या करारनाम्याचे नुतनीकरण गेल्या सुमारे 10-11 महिन्यांपासून रखडलेले आहे. बँकेच्या अमृतमहोत्सवी वर्षात कर्मचा-यांच्या पगाराबाबत करार न होणे ही निश्चितच बॅन्केच्या ख्यातीला नामुष्की आणणारी बाब आहे.

बँकेवर आर्थिक्‍बोजा पडेल म्हणून पगारवाढीचा करारनामा नुतनीकरण करण्यास चालढकल केली जात असेल तर अमृतमहोत्सवी वर्षाच्या थाटामाटात केलेल्या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या वेळी आर्थिक बोजाचे स्मरण राखता आले असते. तसेच फिनॅकल सॉफटवेअरचा केलेला बदल व त्याबदलामुळे नव्याने करावयास लागलेली प्रिंटर्सची खरेदी तसेच अन्य काही बाबींवर होणारा अनावश्यक खर्च आर्थिक्‍बोजा वाढवणारा आहे असे कधी का वाटले नाही हा खरा प्रश्न आहे. फिनॅकल सॉफटवेअर मुळे ग्राहक, आणि शेतकरी सभासद, तसेच बँक कर्मचारी यांच्याही मोठया प्रमाणात तक्रारी येत आहेत. याचा विचार तातडीने होणे गरजेचे आहे.

डिसीसी बँकेच्या कर्मचा-यांच्या वेतनाचा, वेतनस्लॅब आणि वेतनवृध्दीसह जरुर तो करारनामा पूर्वीच होणे अपेक्षित होते. कर्मचा-यांना यापासून वंचित ठेवणे कोणत्याही सन्माननीय सभासद-संचालकाला मान्य होणार नाही. आर्थिक्‍बोजाचे कोणतेही थोतांड न करता, त्यापेक्षा जिथे जिथे काटकसर करता येईल त्याठिकाणी अधिक सक्षमतेने खर्चबचत करुन कर्मचा-यांना दिलासा देणे अत्यावश्यक आहे. तथापि त्यासाठी कर्मचा-यांविषयी सकारात्मक मानसिकताही असली पाहीजे.

सबब, याबाबत तातडीने करारमान्याचे नुतनीकरण करण्यात येवून, कर्मचा-यांचा सेवा-त्याग आणि बँकेच्या प्रगतीमधील योगदान लक्षात घेवून, सातारा डिसीसी बँकेतील कर्मचा-यांना भरघोस पगार वाढ करावी तसेच फिनॅकल सॉफटवेअर बाबतीतील तक्रारींवर योग्य ती उपाययोजना करावी अन्यथा आम्ही वेगळा पवित्रा घेतल्यास, त्यास सर्वस्वी बँकेचे व्यवस्थापन आणि बँक प्रशासन जबाबदार राहील असा गर्भित इशारा देखिल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

समाज बांधव-भगिनींसह सायकल वारीतील सायकलस्वारांनी धरला विठ्ठलनामाच्या गजरात नृत्याचा ठेका; क्रांतिसिंह नाना पाटील चौकात फटाक्यांची आतषबाजी, शाल-श्रीफळ व पुष्पहार देऊन सायकलस्वारांचा सन्मान!

दिनदर्शिकांमध्ये बाळशास्त्री जांभेकरांच्या तीन महत्त्वाच्या दिवसांची अचूक नोंद प्रसिद्ध व्हावी ; महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांचे दिनदर्शिका प्रकाशकांना आवाहन

दुर्गम भागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. निमजे यांचे बडतर्फी प्रकरणी उच्च न्यायालयात 👉 उच्च न्यायालयाने राज्य शासनासह गडचिरोली जिल्हा परिषदेला बजावली नोटीस 👉 जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिंदेचे प्रताप चव्हाट्यावर?

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal