प्राथमिक शिक्षक संघ राज्यस्तरीय भव्य सभा #आवाज शिक्षकांचा साप्ताहिक शुभारंभ
📍 2 फेब्रुवारी 2025
गोंदवले (ता. माण, जि. सातारा) येथे आयोजित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्यस्तरीय भव्य महामंडळ सभा व साप्ताहिक ‘आवाज शिक्षकांचा’ या साप्ताहिकाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे मा. खासदार रणजितसिंह नाईक -निंबाळकर, आमदार अतुल बाबा भोसले, आमदार मनोज घोरपडे, आमदार सचिन पाटील, मा. संभाजी थोरात , भाजपा सातारा जिल्हा सरचिटणीस माढा लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे, संजय (काका) गांधी, श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण आबा गोरे ,हरिभाऊ जगदाळे, मा.जिल्हा परिषद सदस्य अर्जुन तात्या काळे, (नाना),आंधळी गावचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे,शिक्षण उपसंचालक देविदास कुलाळ, शिक्षणअधिकारी शबनम मुजावर, गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे,प्राथमिक शिक्षक सहकारी बँक सातारा मा.चेअरमन श्री बलवंत पाटील सर, यांच्यासह अनेक मान्यवर शिक्षक , संघाचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रासमोरील विविध आव्हाने, उपाययोजना आणि धोरणात्मक बदल यावर सभेत विचारमंथन झाले. प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया आहे. शिक्षण क्षेत्रात आवश्यक सुधारणा घडवण्यासाठी शिक्षकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. शिक्षकांचे हक्क, मागण्या, वेतनश्रेणीतील सुधारणा, नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी, डिजिटल शिक्षण आणि ग्रामीण भागातील शाळांचे सक्षमीकरण यासंदर्भात अनेक बाबी यावेळी अधोरेखित केल्या. ‘आवाज शिक्षकांचा’ या साप्ताहिकामुळे शिक्षण क्षेत्रातील प्रश्न, त्यांच्या यशोगाथा आणि नवकल्पना समाजापर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच लाभ होईल.











