अ‍ॅग्रीस्टॅक योजने अर्तंगत फार्मर आयडी तयार करणे पूर्णपणे मोफत ; पैशांची मागणी केली तर त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करा : जिल्हाधिकारी संतोष पाटीलl

अ‍ॅग्रीस्टॅक योजने अर्तंगत फार्मर आयडी तयार करणे पूर्णपणे मोफत ; पैशांची मागणी केली तर त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करा : जिल्हाधिकारी संतोष पाटील

फार्मर आयडीसाठी 25 ते 30 रुपये शुल्क घेऊन सदर नोंदणी करण्याचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांचे निर्देश – शेतकऱ्यांमध्ये संभ्रम 

फलटण प्रतिनिधी – शेती क्षेत्राला प्रगत आणि शाश्वत बनविण्यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या अ‍ॅग्रीस्टॅक योजने अर्तंगत फार्मर आयडी तयार करून घ्यावा. शेतक-यांनी सीएससी सेंटर, महाऑनलाईन (सेतू) केंद्र या माध्यमातून मोफत नोंदणी करावी असे सांगतानाच फार्मर आयडी काढणे पूर्णपणे मोफत असून कोणी पैशांची मागणी केली तर त्यांच्या विरोधात माझ्याकडे तक्रार दाखल करा असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे. तर फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी 25 ते 30 रुपये शुल्क घेऊन सदर नोंदणी करण्याचे निर्देश दिले असल्याने फलटण तालुक्यात उलट – सुलट चर्चाना उधाण आले आहे एकंदरीतच फलटण तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एकीकडे महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढण्याचे आवाहन केले असून ते काढण्यासाठी मोफत ई महासेवा केंद्र, सीएससी केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र सर्व ठिकाणी ही सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. पण दुसरीकडे ई महासेवा केंद्र, सीएससी केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र चालक शेतकऱ्यांचा गैरफायदा घेत 50 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत पैसे घेत आहेत. 

सी. एस. सी. सेवा केंद्र यांनी कामासाठी दिलेला वेळ, त्यांची वापरली जाणारी साधनसामुग्री, त्यांचे वॉलेट मधून वजा होणारी रक्कम पाहता त्यांना वाजवी 25 ते 30 रुपये शुल्क घेऊन सदर नोंदणी करण्याचे निर्देश फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिले आहेत. प्रत्यक्षात 50 ते 300 रुपयांची आकारणी प्रति फार्मर आयडी तयार करून घेताना मागणी होऊ लागली असून मोफत योजनेतूनही शेतकऱ्यांची कोट्यवधीची आर्थिक लूट फलटण तालुक्यात होऊ लागली आहे. फलटण तालुक्यात जवळपास 2 लाख 47 हजाराहून अधिक शेतकरी आहेत. अ‍ॅग्रीस्टॅक योजने अर्तंगत फार्मर आयडी तयार करणे पूर्णपणे मोफत असून याबाबत कोणीही पैशांची मागणी केली तर त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करा असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

या आर्थिक लुटीला वेळीच आळा नाही बसला तर कोट्यवधीची लूट फलटण तालुक्यात होईल. त्यामुळे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांची लूट थांबवून सी. एस. सी. सेवा केंद्रावर कारवाई करण्याची मागणी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.योजनांच्या जीवावर दुकानदारी चालवणाऱ्या दलालांना जिल्हाधिकारी आवर घालणार का ? या दलालांवर कारवाई करणार का असाही सूर शेतकऱ्यांमधून उमटत आहे. शेतकऱ्यांमध्ये ही फार्मर आयडी कार्ड बाबत उत्सुकता आहे. त्यामुळे प्रशासन नेमकी भूमिका काय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चौकट – 1) फार्मर आयडी तयार करून घेताना कोणी पैशांची मागणी केल्यास त्याच्या विरोधात माझ्याकडे तक्रार दाखल करा तात्काळ कारवाई करण्यात येईल – जिल्हाधिकारी संतोष पाटील

2) फार्मर आयडीसाठी 25 ते 30 रुपये शुल्क घेऊन सदर नोंदणी करण्याचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांचे निर्देश दिले आहेत. तर प्रत्यक्षात 50 ते 300 रुपयांची आर्थिक लूट फलटण तालुक्यात सुरु आहे. शेतकऱ्यांमधून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

3) 2 लाख 47 हजाराहून अधिक शेतकरी फलटण तालुक्यात असून 300 रुपयांची प्रत्येकी लूट सुरु असून कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक लूट जिल्हाधिकारी यांनी थांबवावी.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें