फलटणचे “राजे” पुन्हा “सत्तेच्या” वाटेवर ?

फलटणचे “राजे” पुन्हा “सत्तेच्या” वाटेवर ? 

फलटण प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बडे नेते संजीवराजे नाईक निंबाळकर पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या म्हणजेच राज्यातील  “सत्तेच्या” वाटेवर? असल्याची माहिती आता समोर येत आहे . त्यामुळे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे एका वृत्तवाहिनीने खात्रीलायक सूत्रांच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त दिला आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेत राजे नाईक निंबाळकर , विश्वजीत राजे नाईक निंबाळकर हे अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. या तीनही नेत्यांनी विधानसभा निवडणुकी वेळी शरद पवारांसोबत जात तुतारी हाती घेतली होती. संजीवराजे नाईक निंबाळकर हे ज्येष्ठ नेते व अजूनही अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू आहेत .त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे. 

संजीवराजे नाईक निंबाळकर हे विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आले होते. यानंतर दीपक चव्हाण यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली होती .तर त्यांच्या विरोधात अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिन कांबळे पाटील यांना उमेदवारी दिली होती . फलटण कोरेगावच्या जागेवर भाजपने दावा केला होता .भाजपने महायुतीत या जागेची मागणी केली होती. पण या जागेवर खरा दावा राष्ट्रवादीचा होता. कारण राष्ट्रवादीचे इथे ताकद होती .त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे साठी ही जागा सुटली होती. सचिन कांबळे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढले. तर संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दीपक चव्हाण यांना उमेदवार म्हणून उभं केलं होतं. पण त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. यानंतर काहीच महिन्यांनी आता संजीवराजे नाईक निंबाळकर हे पुन्हा एकदा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. 

रामराजे नाईक निंबाळकर हे पश्चिम महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली तेव्हा त्यांनी अजित पवार यांच्या साथीने पुढे जाण्याचे निश्चित केलं पण लोकसभा निवडणुकी वेळी माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत असणाऱ्या मतभेदामुळे त्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला. त्यांनी रणजीतसिंह यांच्या उमेदवारीला प्रचंड विरोध केला. तरी भाजपने तो विरोध जुगारून रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनाच उमेदवारी दिली. या काळात रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवारांना शरद पवार यांच्या पक्षात जाण्याबाबत इशारा दिला होता.

अनेकांचे वेट अँड वॉच?

दरम्यान , फलटण मधील राजे गटातून अजित पवारांच्या गटात प्रवेश करणाऱ्यांनी सध्या सावध भूमिका घेतली आहे .रामराजे नसल्याने तिकडे जावे तर पुन्हा रामराजे मागावून येऊन तेच राष्ट्रवादीत बॉस होणार असतील तर आपल्या प्रवेशाला काय अर्थ? असा विचार करून अनेकांनी सध्या वेट अँड वॉच ची भूमिका घेतली आहे. रामराजे सर्व सैन्यासह खुलेआम अजित पवारांसोबत येऊन फलटणच्या राष्ट्रवादीच्या आमदारांचे नेतृत्व मानणारा का? महायुतीचे घटक असलेले रणजीतसिंह निंबाळकर यांची काय भूमिका राहणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 
AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें