म्हसवड पोलिसांचा भोंगळ कारभार? गंभीर त्रासानंतरही पीडित महिलेच्या हाती फक्त ‘एन.सी.आर.’ ची पावती; तीव्र संताप!

म्हसवड पोलिसांचा भोंगळ कारभार? गंभीर त्रासानंतरही पीडित महिलेच्या हाती फक्त ‘एन.सी.आर.’ ची पावती; तीव्र संताप!

प्रतिनिधी शिवाजी भोसले

एकीकडे महिला सुरक्षेचे मोठे दाव केले जात असताना, दुसरीकडे प्रत्यक्षात मात्र पीडित महिलांना न्याय मिळवण्यासाठी प्रशासकीय उदासीनतेचा सामना करावा लागत असल्याचे चित्र म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आले आहे. गंभीर त्रास आणि छळाची तक्रार घेऊन आलेल्या पीडित महिलेला कठोर कारवाईचे आश्वासन देण्याऐवजी पोलिसांनी केवळ अदखलपात्र (N.C.R.) गुन्हा दाखल करून हात वर केल्याचा गंभीर आरोप केला जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार महिला कोमल अभिजीत भोसले (वय ३७ वर्षे, रा . फोंडशिरस तालुका माळशिरस सध्या .राहणार पानमळा म्हसवड, ता. माण, जि. सातारा) यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी महिलेचे पती अभिजीत नाना भोसले याने मोबाईलवर फोन करून शिवीगाळ व दमदाटी केली.
यापूर्वीही कित्येक दिवस पीडित महिलेला मोठा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागल्याचे तिचे म्हणणे आहे. मात्र, पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य न ओळखता केवळ भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३५१(२) व ३५२ अन्वये अदखलपात्र गुन्हा (NCR No. 1063/2026, दिनांक २८/०९/२०२६) नोंदवून तक्रारदाराला न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला.
पीडितेचा गंभीर आरोप आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न
पीडित महिलेचे म्हणणे आहे की, तिची तक्रार ही गंभीर स्वरूपाची असून पोलिसांकडून कठोर आणि तात्काळ कारवाई अपेक्षित होती. परंतु पोलिसांनी केवळ कागदी सोपस्कार पूर्ण करून एनसीआर (N.C.R.) देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला आहे.
“महिलांना एवढा त्रास होऊनही पोलीस कोणतीही ठोस कारवाई करत नसतील, तर पीडितांनी न्यायासाठी कुणाकडे जायचे?” असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.

महिला सांगण्यावरून गुन्हा दाखल नाही तात्पुरत्या स्वरूपाचा खेळ..?

कौटुंबिक कारणावरून विवाहितेला शिवीगाळ करून धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पती अभिजित नाना भोसले याच्याविरोधात म्हसवड पोलीस ठाण्यात अदखलपात्र (Non-Cognizable – NC) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार कोमल अभिजित भोसले (वय ३७, रा. पानमळा म्हसवड, ता. माण, जि. सातारा; मूळ रा. फोडशिरस, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८:३० वाजण्याच्या सुमारास, मौजे पानमळा म्हसवड येथील तक्रारदार यांच्या भ्रमणध्वनीवर (मोबाईलवर) त्यांचे पती अभिजित नाना भोसले (रा. फोडशिरस, ता. माळशिरस) यांनी फोन केला. कौटुंबिक कारणावरून त्यांनी तक्रारदार व साक्षीदार निर्मला भारत सरतापे यांना शिवीगाळ करत धमकी दिली.
पोलीस कारवाई:
याप्रकरणी तक्रारदार यांच्या खबरीवरून म्हसवड पोलीस ठाण्यात नोंद क्र. १०६३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३५१(२) व ३५२ अंतर्गत अदखलपात्र (NC) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर बाब अदखलपात्र स्वरूपाची असल्याने तक्रारदारास योग्य त्या न्यायालयात दाद मागण्याबाबत पोलीस ठाण्याकडून समज देण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार कुंभार (बकल नं. ४२९) करत आहेत.

म्हसवड पोलिसांच्या या ढिम्म आणि निष्काळजी कारभारामुळे पीडित महिला भयभीत वातावरणात जगत आहे. या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून संबंधित आरोपीवर कडक कायदेशीर कारवाई करावी आणि पीडित महिलेला योग्य न्याय व संरक्षण द्यावे, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें