तळेगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सेवा संकल्प अभियान -विदयार्थ्यांना दिली शैक्षणिक योजणांची माहिती
तळेगाव प्रतिनिधी मनोज गवळी : –
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तळेगाव येथे ‘सेवा संकल्प अभियान–विकसित भारत’ अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाजकल्याण विभाग तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI) यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी, यासाठी विशेष कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य श्री. रवींद्र वाबळे, शिक्षक श्री. तुषार निकम,अमोल सोनावणे, सुनंदा गोरे, गायकवाड मॅडम,मनोज शिंपी, दीपक सूर्यवंशी, गणेश गोराने, शुभम देशमुख, शुभम देशमुख,,तसेच इतर शिक्षक उपस्थित होते. यावेळी चाळीसगाव तालुका समन्वयक अनिल पगारे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत समाजकल्याण विभाग व बार्टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक योजनांची सविस्तर माहिती दिली. विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, आधार योजना, स्वयम् योजना, शासकीय वसतिगृह प्रवेश, शिष्यवृत्ती, शैक्षणिक सवलती तसेच उच्च शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या विविध योजनांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. केवळ योजना अस्तित्वात असणे पुरेसे नसून, ज्या विद्यार्थ्यांसाठी या योजना आहेत, त्या विद्यार्थ्यांपर्यंत त्यांची माहिती पोहोचणे आणि पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करून योजनांचा लाभ घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे अनिल पगारे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक व आर्थिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी शासनाच्या शैक्षणिक योजनांचा प्रभावी उपयोग विद्यार्थ्यांनी करून घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती, वसतिगृह प्रवेश, स्वाधार योजना, उच्च शिक्षणाच्या संधी तसेच योजनांसाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया याबाबत विविध प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची माहिती देण्यात आली.“शासनाच्या योजना आणि विद्यार्थ्यांमध्ये माहितीची दरी राहू नये, प्रत्येक पात्र विद्यार्थ्यापर्यंत योजना पोहोचली पाहिजे,” या उद्देशाने तालुक्यातील शाळा, महाविद्यालये आणि विविध वस्त्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन जनजागृती करण्याचे काम सुरू असल्याचे अनिल पगारे यांनी सांगितले.












