खराडेवाडी मध्ये श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचे ४१ वी समाधी सोहळा सप्ताहाचे आयोजन ५ ऑगस्ट पासून विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल!

खराडेवाडी मध्ये श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचे ४१ वी समाधी सोहळा सप्ताहाचे आयोजन ५ ऑगस्ट पासून विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल!

फलटण प्रतिनिधी शिवाजी भोसले

खराडेवाडी येथे श्री संत सावता महाराज मंदिरात श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचे वर्ष ४१ वे समाधी सोहळा सप्ताहाचे दिनांक ५ ऑगस्ट पासून भव्य आयोजन करण्यात आले आहे

 

बुधवार, दिनांक ५ ऑगस्ट २०२६ ते बुधवार, दिनांक १२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हा अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात पार पडणार आहे.

पंचक्रोशीतील सर्व भाविक, माता-भगिनी आणि वारकरी भक्तांनी या धार्मिक पर्वाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री संत सावता महाराज मंदिर ट्रस्ट, खराडेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

📌 सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत.

पहाटे ४ ते ६ : काकडा भजन

सकाळी ८ ते ११ : व दुपारी ३ ते ४ : चरित्र वाचन सायंकाळी ५ ते ६ : प्रवचन

सायंकाळी ६ ते ७ : हरिपाठ

रात्री ७ ते ९ : किर्तन

रात्री ९ ते १० : दररोज महाप्रसादाचा कार्यक्रम

🌟 विशेष आकर्षण व मुख्य कार्यक्रम :

दिंडी व मिरवणूक : मंगळवार, दिनांक ११ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ४ ते ६ ह.भ.प. श्री रविंद्र टिळेकर सर खराडेवाडी यांचे पुष्पकाळाचे (फुलाचे) किर्तन व सायं ४.३० ते ६.३० वाजता श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पादुका व प्रतिमेची रथातून वारकरी सांप्रदाय दिंडी सोहळ्यासह भव्य मिरवणूक निघणार आहे.

काल्याचे कीर्तन : बुधवार, दिनांक १२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. आकाश महाराज कामथे (जेजुरी) यांचे काल्याचे किर्तन होईल.

महाप्रसाद : बुधवार, १२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप केले जाईल.

 सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त सभासद, श्री संत सावता महाराज मंदिर ट्रस्ट, खराडेवाडी यांनी केले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें