निरा-मोरगाव रस्त्यावरील अपघात! दोन बहिणीं पाठोपाठ लहान भावाचाही मृत्यू

निरा-मोरगाव रस्त्यावरील अपघात! दोन बहिणीं पाठोपाठ लहान भावाचाही मृत्यू

फलटण प्रतिनिधी

 निरा–मोरगाव राज्य मार्गावरील चौधरवाडी फाटा येथे शनिवारी (दि. ६) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन सख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या लहान भावाचा देखील पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने बोडरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे फलटण तालुक्यातील मुरूमसह संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

 मुरूम (ता. फलटण) येथील सेजल ज्ञानेश्वर बोडरे (वय १७), अक्षरा ज्ञानेश्वर बोडरे (वय १५) आणि त्यांचा भाऊ पवन ज्ञानेश्वर बोडरे (वय १२) हे बारामती तालुक्यातील मुर्टी येथील मामाच्या गावाला जाण्यासाठी इलेक्ट्रिक स्कुटीवरून निघाले होते. चौधरवाडी फाट्याजवळ त्यांच्या स्कुटीची आणि आयशर टेम्पो यांची समोरासमोर भीषण धडक झाली होती या भीषण अपघातात सेजल व अक्षरा या दोन्ही बहिणींचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पवन गंभीर जखमी झाला होता त्याला तातडीने बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात हलविण्यात आले होते.

मात्र मृत्यूशी सुरू असलेली त्याची झुंज अखेर अपयशी ठरली आणि मंगळवार (दि. ९) रात्री १.३० वाजता उपचारादरम्यान पवनचेही दुःखद निधन झाले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें