खाजगी डॉक्टरांसोबत कोणाचे लागेबांधे? सरकारी रुग्णालयात जाहिरात झळकली

खाजगी डॉक्टरांसोबत कोणाचे लागेबांधे? सरकारी रुग्णालयात जाहिरात झळकली

फलटण : फलटण येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये चक्क एका खाजगी हॉस्पिटलची जाहिरात लावण्यात आल्याने आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णालयातील केस पेपर विभागासमोर तसेच मुख्य प्रवेशद्वारातच खाजगी डॉक्टरांचा स्टँडी लावण्यात आल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

सरकारी रुग्णालयामध्ये खाजगी डॉक्टरांची चिठ्ठी देणे, बाहेरील औषधे सुचवणे अथवा रुग्णांना खाजगी रुग्णालयांकडे वळवणे यावर नियमांनुसार बंदी असताना, थेट रुग्णालय परिसरातच खाजगी हॉस्पिटलची जाहिरात झळकणे गंभीर मानले जात आहे. त्यामुळे संबंधित खाजगी डॉक्टरांसोबत कोणाचे लागेबांधे आहेत? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे, रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येत असतात. अशा ठिकाणी खाजगी हॉस्पिटलची जाहिरात लावल्याने सामान्य रुग्णांवर अप्रत्यक्ष प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ही जाहिरात कोणाच्या परवानगीने लावण्यात आली? प्रशासनाला याची माहिती होती का? तसेच यामागे कोणते आर्थिक हितसंबंध आहेत का? याबाबत सातारा जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून पुढे येत आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थी दिल्लीकडे रवाना ⭕राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी दिल्लीसह राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट; विद्यार्थ्यांना नवे ज्ञान व प्रेरणा मिळणार

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal