धाडणे येथे आज “माझे गाव आरोग्य संपन्न गाव” या शिबिरात दीडशे रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
साक्री प्रतिनिधी :- (विलासराव पाटील.)
कासारे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या धाडणे उपकेंद्रामध्ये आज “माझे गाव आरोग्य संपन्न गाव” या शिबिराचे उद्घाटन धाडणे येथील लोकनियुक्त सरपंच श्रीमती उषाताई सोनवणे यांनी केले. केंद्र शासनाने *”टीबी मुक्त भारत”* आणि *”सिकलसेल मुक्त भारत*” या दोन घोषणा केलेल्या आहेत. यावेळी टी. बी. मुक्त भारत आणि सिकलसेल मुक्त भारत यावर जास्त जोर देण्यात आला. यावेळी आलेल्या रुग्णांची सर्व रोग निदान या पद्धतीने तपासणी करण्यात आली. तसेच इथे येणार्या रुग्णांची बीपी, शुगर, ईसीजी, एक्स-रे, ब्लड टेस्ट, सीबीसी वगैरे इत्यादी तपासण्या करण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ.मोहिनीराज देशपांडे हे खास धुळ्याहून आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी येथील आरोग्य अधिकारी डॉ. जे.एस.गाढे यांनी तसेच सर्व आशा कार्यकर्त्या आणि सिस्टर वगैरे सगळ्यांनी मेहनत घेतली.
जिल्हा आरोग्य अधिकारी, यांचे आदेशान्वये, तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बोडके सर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड सर , आणि
वैद्यकीय अधिकारी
डॉ. रेवाची कुवर सर. वैद्यकीय अधिकारी डॉ. गायत्री अहिरे मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली
समुदाय आरोग्य अधिकारी श्री. जे. एस. गाढे सर,श्री. योगेश पाटोळे सर,
श्री दिपक पाटील सर,
डॉ. विशाल घरटे सर,
तसेच क्षयरोग तालुका व्यवस्थापक श्री.बैसाणे भूषण. क्षयरोग
तालुका व्यवस्थापक
श्री.अजय पवार, श्री. सारंग गव्हाणे सर
आरोग्य सुपरवायझर
श्री प्रकाश कुवर नानासाहेब
आरोग्य सेविका
श्रीमती जया अहिरे. सिस्टर,श्रीमती साळुंखे सिस्टर श्रीमती खैरनार सिस्टर, श्रीमती महाले सिस्टर, आरोग्य सेवक श्री. आकाश राऊत भाऊ, श्री. शरद पवार नाना, श्री भूषण अहिरे नाना, श्रीमती पुष्पा राऊत सिस्टर,आशा गटप्रवर्तक श्रीमती पुनम अहिरराव मॅडम,
आशा कार्यकर्त्या
श्रीमती सुनिता अहिरराव, श्रीमती सुषमा अहिरराव. यांच्या टीमने मेहनत घेऊन हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडले. यावेळी सुमारे दीडशे लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.











