“सामान्यांना अडवून बँकेची मनमानी; आमदार भोंगळेंची थेट धडक”

“सामान्यांना अडवून बँकेची मनमानी; आमदार भोंगळेंची थेट धडक”

कोरपणा प्रतिनिधी मनोज गोरे —

मार्च एंडिंगच्या तोंडावर बँक व्यवहार सुरळीत सुरू राहणे अत्यावश्यक असताना, वेळेपूर्वीच व्यवहार बंद केल्याच्या गंभीर तक्रारींनंतर आमदार देवराव भोंगळे यांनी कोरपना येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेत अचानक धडक देत शाखा व्यवस्थापक वासनिक यांना चांगलेच सुनावले.

मिळालेल्या माहितीनुसार, एका ग्राहकाने फोनद्वारे बँकेतील गैरप्रकारांची माहिती आमदार भोंगळे यांना दिली. या तक्रारीची तात्काळ दखल घेत त्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता बँकेत भेट दिली व शाखा व्यवस्थापकाला थेट जाब विचारला.

मार्च एंडिंगच्या काळात शेतकरी व व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक कामे प्रलंबित असतात. विशेषतः पीक कर्ज भरणे, खाते व्यवहार पूर्ण करणे यासाठी बँक वेळेत सुरू असणे अत्यंत गरजेचे असते. मात्र, संबंधित शाखेत वेळेपूर्वीच व्यवहार बंद केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती.

यावेळी बँकेत उपस्थित असलेल्या ग्राहकांनी आमदारांसमोर तक्रारींचा पाढाच वाचला. कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनामुळे अनेकांनी आपले व्यवहार इतर बँकांकडे वळवले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वीही या शाखेविरोधात अनेक तक्रारी झाल्या असूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याची बाबही उघड झाली.

या सर्व प्रकारावर संतप्त होत आमदार भोंगळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश वरिष्ठ स्तरावर दिले. “सामान्य नागरिकांना त्रास देणारी व मनमानी करणारी व्यवस्था अजिबात खपवून घेतली जाणार नाही. भविष्यात अशा घटना पुन्हा घडल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होईल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

आमदारांच्या या आक्रमक भूमिकेमुळे बँक प्रशासनात एकच खळबळ उडाली असून, उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र, दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करूनच न्याय मिळावा, अशी ठाम मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या प्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष संजय मुसळे, शहराध्यक्ष अमोल आसेकर, अरुण मडावी, विजय पानघाटे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा . 👉 विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा 👉 रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा . 👉 विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा 👉 रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर