चाळीसगावात उद्या सहजयोग कुंडलिनी जागृती आत्मसाक्षात्कार कार्यक्रम सोहळा

चाळीसगावात उद्या सहजयोग कुंडलिनी जागृती आत्मसाक्षात्कार कार्यक्रम सोहळा

 

(चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव):- 

परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोगाद्वारे कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्काराचा जाहीर कार्यक्रम उद्या दि. ११ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता शहरतील राष्ट्रीय महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. राज्यातून आलेले सहजयोगी साधक चाळीसगाव शहरातील प्रत्येक घरी जाऊन कार्यक्रमाचे आमंत्रण सर्वांना देत आहेत. या कार्यक्रम निमित्त भव्य शोभा यात्रेचे आयोजन परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक दुपारी चार वाजता मौर्य लॉन्स पासून सुरू होऊन सायंकाळी राष्ट्रीय विद्यालयाच्या प्रांगणात येईल.

तरी चाळीसगाव शहरातील सर्व बंधू-भगिनींनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्काराचा लाभ घ्यावा असे आवाहन चाळीसगाव सहज परिवाराने केले आहे. सहजयोगाद्वारे कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्कार प्राप्त केल्यानंतर श्रीमद् शंकराचार्यांनी वर्णन केल्याप्रमाणे आपल्या हातातून, टाळूतून सलिलम्- सलिलम् चैतन्याची जाणीव आपल्याला होते. साधकाने रोज सकाळ-संध्याकाळ घरी ध्यान करायचे असते व आठवड्यातून एकदा सगळ्यांसोबत एकत्र येऊन सामूहिक ध्यान करायचे असते. रोज नित्य नियमित केलेल्या सहजयोग साधनेच्या गहनतेने आपल्यामध्ये संतुलन स्थापित झाले तर सर्व प्रकारांच्या आजारांपासून आपण सुरक्षित राहतो, विद्यार्थ्यांनी नियमित ध्यानधारणा केल्यास त्यांचा EQ, IQ,SQ वाढतो, मानसिक शांती प्राप्त होते, सहजयोग ध्यानाद्वारे पूर्णतः व्यक्तिमत्व विकास होतो. नियमित सहजयोग ध्यान साधनेने आपल्यामध्ये मानसिक प्रगती, शारीरिक प्रगती व आध्यात्मिक प्रगती साधली जाते. त्यामुळे या कार्यक्रमाचा लाभ जास्तीजास्त भावीकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें