जळगाव येथे झालेल्या वुमन किक बॉक्सिंग स्पर्धेत चाळीसगावच्या खेळाडूंचे यश
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :-
जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात २० ते २१ डिसेंबर दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या अस्मिता वुमन किक बॉक्सिग स्पर्धेत चाळीसगावच्या खेळाडूंनी यश संपादन केले आहे. या स्पर्धेत चाळीसगावच्या ९ खेळाडूंनी सहभाग घेऊन सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंमध्ये आदिती जाधव, वैष्णवी देशमुख, रितिका तिवारी, जीवनी कुलकर्णी, रचना जाधव, आशिया शेख, गौरी जाधव, अवंतिका मंगलकर, शिक्षिका जोशी यांचा समावेश होता. या सर्व यशस्वी खेळाडूंची २५ ते २८डिसेंबर दरम्यान इंदोर पब्लिक स्कूल येथे होणाऱ्या झोनल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंना अनिल मंगलकर व शुभम शेटे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी खेळाडूंना पुढील स्पर्धांसाठी सदिच्छा दिल्या आहेत. या सर्व खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.













