तरवाडे येथील बेपत्ता असलेल्या नऊ वर्षीय बालिकेचा मृतदेह विहिरीत आढळला

तरवाडे येथील बेपत्ता असलेल्या नऊ वर्षीय बालिकेचा मृतदेह विहिरीत आढळला

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :-

 तालुक्यातील तरवाडे येथील बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह गावाजवळील जंगलातील एका विहिरीत आढळल्याचे खात्रीशीर वृत्त समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. संबंधित मुलगी ही गेल्या शुक्रवार दि. 12 डिसेंबर पासून बेपत्ता झाल्याची नोंद असून तिचा शोध कुटुंबीय, ग्रामस्थ व पोलीस यंत्रणा संयुक्तपणे घेत होते. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. विहिरीतून मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला असून . मृत्यूचे नेमके कारण, घटना कशी घडली, तसेच यात कोणताही गुन्हेगारी प्रकार आहे का, याबाबत पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेबाबतची अधिकृत माहिती स्पष्ट होणार आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी शांतता राखून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसां कडून करण्यात आले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें