साक्री तालुक्यातील फौजी संदीप अहिरराव यांचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू.
साक्री प्रतिनिधी : विलासराव पाटील :
साक्री तालुक्यातील धाडणे येथे दिवाळीच्या सुट्टीवर आलेले भारतीय सैन्य दलातील हवालदार श्री संदीप गुलाबराव अहिरराव यांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला.
दिवाळीच्या सुट्टीमध्ये मुलांना गावाकडे फिरवून आणू आणि आपल्या सगळ्या नातेवाईकांना भेटू या उद्देशाने सुट्टीवर आलेले संदीप अहिरराव हे सोमवारी आपल्या कुटुंबाला घेऊन नाशिककडे जात असताना त्यांना सोग्रस फाट्याजवळ घाम यायला लागला त्यानंतर त्यांची पत्नी त्यांना नाशिककडे घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
त्यानंतर देवळाली कॅम्प येथील सैन्य रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले.
मंगळवारी सकाळी त्यांना देवळाली कॅम्प येथे मिलिटरी तर्फे सलामी देण्यात आली. त्यानंतर नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात त्यांच रीतसर पोस्टमार्टम करण्यात आलं, आणि ते साक्रीच्या दिशेने निघाले.
मंगळवारी रात्री साडेआठ वाजता धाडणे येथील त्यांच्या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी *वीर जवान अमर रहे* अशा घोषणा देत गावातील तरुणांनी आणि फौजींनी मिळून त्यांना स्मशानापर्यंत नेले. साक्री पोलीस दलातर्फे पाठवण्यात आलेल्या पाच हवालदारांनी त्यांना बिगुल वाजवून आणि बंदुकीने फायर करून सलामी दिली.
मेजर निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार यावेळी 305 मिलिटरी रेजिमेंट, रोशनी सिक्स, श्रीनगर. येथून ए. एल. एस. आर्मी ट्रक रायफल सहित पाठविण्यात आलेला होता. यावेळी श्री संदीप अहिरराव यांच्या युनिटमधील हवालदार श्री संदीप घोरपडे हे सुद्धा आलेले होते. हा ट्रक त्यांनी पूर्णपणे सजवून आणलेला होता.यामध्ये एकूण नऊ जवान रायफल सहित होते. यामध्ये नाशिकचे हवालदार कुमुद देवरे नायक दीपक सिंघा, गनर कुंदन कुशवाह, गनर सुब्रतो मंडल, गनर एस दास,
गनर अभिषेक के एल. तसेच अग्निवीर विनयकुमार आणि अग्निवीर मितेश हे आलेले होते. क्राइम ब्रांच नाशिक येथील हवालदार श्री सुनील खैरनार आणि श्री गणेश बोरसे हे सुद्धा त्यांच्यासोबत दोन दिवसापासून जातीने हजर होते. गावातीलच माजी सैनिक श्री दीपक भदाणे श्री भटू अहिरराव व श्री संजय अहिरराव हे स्वतः सुद्धा त्यांच्यासोबत जातीने हजर होते.
यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, साक्री तहसील कार्यालयातर्फे पाठवण्यात आलेले प्रतिनिधी निवासी नायब तहसीलदार श्री पेंढारकर,कासारे मंडळाचे सर्कल श्री लोंढे नाना, शेणपूरचे तलाठी श्री वारुंगसे आणि कासारे चे तलाठी श्री कैलास पाटील हे उपस्थित होते.
यावेळेस गावातील सरपंच श्रीमती उषाबाई सोनवणे, उपसरपंच श्री छोटू बोरसे, श्री आशिष अहिरराव. पोलीस पाटील श्री चेतन अहिरराव, धाडणे वि.का. सोसायटीचे चेअरमन श्री दिनेश अहिरराव, व्हाईस चेअरमन गोकुळ शेठ थोरात, ग्रामपंचायत तसेच सोसायटीचे आजी माजी सर्व पदाधिकारी गावातील सर्व नवयुवक मंडळ त्यांचे सगळे नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
साक्री प्रतिनिधी : विलासराव पाटील.













