फलटण येथील पीडित महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी एस.आय.टी पथकाची नेमणूक 

फलटण येथील पीडित महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी एस.आय.टी पथकाची नेमणूक 

फलटण प्रतिनिधी :- फलटण येथील पीडित महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी एस.आय.टी प्रमुख तथा समादेशक राज्य राखीव बल गट क्रमांक -१ च्या तेजस्वी सातपुते यांनी विशेष तपास पथकामध्ये पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण येथील अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे .याबाबतचे आदेश समादेशक तेजस्वी सातपुते यांनी निर्गमित केले आहे.

या विशेष तपास पथकामध्ये पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, तपास अधिकारी तथा फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे ,पुणे ग्रामीण लोणावळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड, कराड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार ,सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष तपास पथकामध्ये अधिकाऱ्यांची नेमणूक झाल्याने तपासाला गती मिळणार आहे.

 दरम्यानच या प्रकरणातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे .कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी आज बुधवारी याबाबतचा आदेश काढला आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें