फलटण तालुक्याला प्रादेशिक पर्यटन विकास मधून दोन कोटी रुपये मंजूर… आमदार सचिन पाटील..

फलटण तालुक्याला प्रादेशिक पर्यटन विकास मधून दोन कोटी रुपये मंजूर… आमदार सचिन पाटील..

फलटण प्रतिनिधी : फलटण तालुक्यातील पर्यटन स्थळाच्या ठिकाणी मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत दोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मा खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर व मी राज्य शासनाकडे सातत्याने फलटण कोरेगाव मतदार संघातील खालील गावामध्ये पर्यटन स्थळामध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध झाले पाहिजेत व त्याचं आधुनिकरण व्हावे यासाठी प्रयत्न करत होतो व आज त्या साठी निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे खालील गावामध्ये कामे लवकरच सुरू होणार आहेत. १) गोखळी येथे निरा नदीवरील घाट बांधणे व विकसित करणे.. ४० लाख २) सोमथळी येथे हनुमान मंदीर परिसरात शेड बांधणे व परिसर विकसित करणे ३० लाख ३) नाईकबोमवाडी येथे तातमगिरी देवस्थान व्यास ऋषी समाधी स्थळा पर्यंत पायऱ्या बांधणे. २५ लाख ४) फलटण येथे श्रीकृष्ण डोह विकसित करणे ४० लाख ५) कोरेगाव भावेनगर येथे घुमाई देवी मंदिर ओढ्यावर झुलता पूल बांधणे २० लाख ६) कोरेगाव चौवनेश्वर येथे चौणेश्वर मंदिर परिसरात भक्तनिवास बांधणे १० लाख ७) कोरेगाव सोळशी येथे शनि देवस्थान मंदिराकडे जाणारा रस्ता सुधारणा करणे १५ लाख ८) कोरेगाव विकले येथे जोगमट परिसरात संरक्षण भिंत बांधणे २० लाख मंजूर एकुण २ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तालुक्यातील सर्व धार्मिक स्थळांचा विकास करणार आहे असे आमदार सचिन पाटील यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे..

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें