दिलीपसिंह भोसले यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन 

दिलीपसिंह भोसले यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन 

फलटण प्रतिनिधी:- श्री सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक 14 ऑक्टोंबर रोजी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सत्कार समितीच्या वतीने देण्यात आली.

शनिवार दि. 11 ऑक्टोंबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये महिला भजनी मंडळ, बाल भजनी मंडळ,पुरुष भजनी मंडळ सहभागी असणार आहेत. विजेत्या भजनी मंडळास 14 ऑक्टोंबर रोजी दुपारी 4 ते 6 यावेळे मध्ये बक्षीस वितरण समारंभ संपन्न होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या भजनी मंडळास रोख रक्कम स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी श्री दिलीपसिंह भोसले यांचा सत्कार समारंभ संपन्न होणार आहे. या स्पर्धेसाठी वारकरी संघटनेचे विशेष सहकार्य लाभणार आहे. या स्पर्धा महाराजा मंगल कार्यालयात सकाळी 7.30 ते सायंकाळी 7 या वेळेत संपन्न होणार आहेत.

14 ऑक्टोंबर रोजी महाराजा मंगल कार्यालयात सकाळी 9 वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.तसेच सायंकाळी 6.30 वाजता वडजल (ता.फलटण) येथे वृक्षारोपण व ग्रामस्थांसाठी वॉटर एटीएम मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 14 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत जिजाई बंगला लक्ष्मी नगर फलटण येथे शुभेच्छा स्विकारण्यात येणार आहेत तसेच सद्गुरु व महाराजा उद्योग समूहातील सभासदांना लाभांश वाटप व कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस व बक्षीस वाटप करण्यात येणार आहे, या कार्यक्रमास फलटणकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री सद्गुरू हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले व महाराजा मल्टीस्टेट को.ऑप. क्रेडिट सोसायटीचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले यांनी केले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

समाज बांधव-भगिनींसह सायकल वारीतील सायकलस्वारांनी धरला विठ्ठलनामाच्या गजरात नृत्याचा ठेका; क्रांतिसिंह नाना पाटील चौकात फटाक्यांची आतषबाजी, शाल-श्रीफळ व पुष्पहार देऊन सायकलस्वारांचा सन्मान!

दिनदर्शिकांमध्ये बाळशास्त्री जांभेकरांच्या तीन महत्त्वाच्या दिवसांची अचूक नोंद प्रसिद्ध व्हावी ; महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांचे दिनदर्शिका प्रकाशकांना आवाहन

दुर्गम भागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. निमजे यांचे बडतर्फी प्रकरणी उच्च न्यायालयात 👉 उच्च न्यायालयाने राज्य शासनासह गडचिरोली जिल्हा परिषदेला बजावली नोटीस 👉 जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिंदेचे प्रताप चव्हाट्यावर?

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal