राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त चाळीसगाव शहरात शस्त्रपुजन व पथसंचलन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त चाळीसगाव शहरात शस्त्रपुजन व पथसंचलन

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त रविवार दि. ५ रोजी चाळीसगाव येथील तेली समाज मंगल कार्यालय येथे आयोजित उत्सवात भगव्या ध्वजाचे तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.हेडगेवार व गोळवलकर गुरुजी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले, व बौद्धिक घेण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.सुनील राजपूत व प्रमुख वक्ते म्हणून देवगिरी प्रांत प्रचारक स्वप्नील चामणीकर यांचे मार्गदर्शन लाभले. यानंतर हजारो स्वयंसेवकांच्या उत्फुर्त उपस्थितीत शहरातून निघालेल्या पथसंचलनामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शहरातील महात्मा फुले स्मारक (अंधशाळा), छत्रपती शिवाजी महाराज चौक, नानासाहेब धर्माधिकारी मार्ग, दत्तवाडी संगम सेतू, घाट रोड हॉटेल सदानंद, नेताजी चौक मार्गे तेली समाज मंगल कार्यालय येथे समारोप झाला. यावेळी ठिकठिकाणी रांगोळ्या टाकून, फुलांची उधळण करत पथसंचलनाचे स्वागत करण्यात आले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें