पंचायत विकास निर्देशांक (PAI 1.0) मध्ये खंडाळा पंचायत समितीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात चौथा क्रमांक पटकावला

पंचायत विकास निर्देशांक (PAI 1.0) मध्ये खंडाळा पंचायत समितीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात चौथा क्रमांक पटकावला

सातारा प्रतिनिधी आबासो धायगुडे

विकास निर्देशांक म्हणजेच PAI 1.0 हा एक अभिनव उपक्रम असून, ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या कार्याचा सर्वांगीण आढावा घेणारा व वस्तुनिष्ठ मोजपट्टी मानला जातो. या निर्देशांकात प्रशासनातील पारदर्शकता, लोकसहभाग, योजनांची प्रभावी अंमलबजावणी, सेवांचा दर्जा, पायाभूत सुविधा, शाश्वत विकास, सामाजिक प्रगती तसेच आर्थिक उन्नती अशा विविध घटकांचा सविस्तर विचार केला जातो. यामुळे प्रत्येक पंचायत समिती व ग्रामपंचायतींच्या कार्यक्षमतेचे योग्य मूल्यांकन होऊन विकासाची स्पर्धात्मक भावना निर्माण होते.

 

खंडाळा पंचायत समितीने या निर्देशांकात चौथा क्रमांक पटकावल्यामुळे तालुक्यातील शासकीय यंत्रणा, ग्रामपंचायती, लोकप्रतिनिधी आणि कर्मचारीवर्ग यांनी केलेल्या एकदिलाने प्रयत्नांचे हे सर्वोत्तम फलित आहे.

 

या उल्लेखनीय यशाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे माननीय ग्रामविकास मंत्री आदरणीय नामदार जयकुमार गोरे साहेब तसेच ग्रामविकास विभागाचे माननीय सचिव श्री. एकनाथजी डवले साहेब (भा.प्र.से.) यशदा चे आदरणीय कलशेट्टी सर यांच्या हस्ते माझा विशेष सत्कार झाला. तसेच मा.नामदार मकरंद (आबा) पाटील मंत्री मदत व पुनर्वसन महाराष्ट्र राज्य व जिल्हा परिषद सातारा यांच्या कुशल मार्गदर्शनाचा लाभ खंडाळा पंचायत समितीला सातत्याने होत आहे. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. यासनी नागराजन मॅडम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विश्वास सिद साहेब,.तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ. अर्चना वाघमळे मॅडम व उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निलेश घुले साहेब श्री.अनिल बगाटे , श्रीधर कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन या यशामागील एक महत्त्वाचा घटक ठरला आहे.

 

यशाच्या या प्रवासात तालुक्यातील आमचे श्री . अजित पाटील तहसीलदार साहेब , लोणंद खंडाळा व शिरवळचे पोलीस निरीक्षक, वनविभागाचे RFO, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, उपाधीक्षक भुमिअभिलेख,सार्वजनिक बांधकाम अभियंता, उप अभियंता बांधकाम, ग्रामीण पाणी पुरवठा व लघु बंधारे ,गट शिक्षणाधिकारी , तालुका आरोग्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी,तालुका कृषी अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, (पंचायत सांख्यिकी, शिक्षण आरोग्य,आयसीडीएस, कृषी) कृषी अधिकारी, बँकांचे शाखाप्रमुख, अधिकारी व अग्रणी बँकेचे अधिकारी, पंचायत समितीतील सर्व विभागांचे प्रमुख, अधिकारी व कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य , गाव पातळीवर काम करणारे सर्व कर्मचारी, आपले सरकार सेवा केंद्राचे डाटा ऑपरेटर तसेच सर्व राज्य शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी एकदिलाने सहकार्य केले.

 

सर्वांच्या समन्वयाने, निष्ठेने आणि मनःपूर्वक घेतलेल्या मेहनतीमुळे खंडाळा तालुक्याने संपूर्ण राज्यात आपली ठळक ओळख निर्माण केली आहे. हा सन्मान हा खंडाळा तालुक्यातील जनतेचा आणि प्रत्येक शासकीय सेवकाचा आहे.

 

भविष्यातही आपण अशाच पद्धतीने एकत्रितपणे काम करून विकासाची नवीन शिखरे सर करू आणि तालुक्याचा लौकिक आणखी उज्ज्वल करू, असा मला ठाम विश्वास आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें