सट्टा पट्टी व दारु विक्रीला कोरपणा ‘खाकी’चा आशीर्वाद ? अल्पवयीन मुले नशेच्या आहारीः पोलिसांनी लक्ष द्यावे

सट्टा पट्टी व दारु विक्रीला कोरपणा ‘खाकी’चा आशीर्वाद ?

अल्पवयीन मुले नशेच्या आहारीः पोलिसांनी लक्ष द्यावे

चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे

कोरपना तालुक्यात गडचंदुर शहरासह कोरपणा शहराला लागूनच ग्रामपंचायत हद्दीत मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात सट्टा पट्टी खेळल्या जात आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूलाच लागून हा सर्व खेळ चालत आहे तेव्हा अवैध दारूची विक्री होत असल्याने वादविवाद, भांडण तंटे वाढले असून, महिलावर्गही मोठ्या प्रमाणात त्रस्त झाला आहे. अनेक तरुण या व्यसनाकडे वळल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त तसेच उघड्यावर पडले आहे. यामुळे गावातील महिलांनी एकत्र येत अवैधरीत्या दारू विक्री बंद करावी, अशी मागणी पोलिसांकडे करण्यासाठी मोर्चा काढला काही गावातील नागरिकांनी ठराव पण घेतला अनेकदा ग्रामीण भागातील महिला पोलीस स्टेशनला धडक दिली मात्र तात्पुरती थातुरर्मातुर कारवाई करून दारू बंद केली जाते व परत कारवाई केली दाखवून चालू केली जात आहे.

 

तालुक्यातील कोरपना स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोरपना गावामध्ये सरकारमान्य परवानाधारी दारू दुकान नसतानाही अवैध दारु विक्री होत आहे. काही जवळपासच्या गावात किराणा दुकानात, हॉटेलमध्ये दारुची विक्री होत आहे,

 

 दारु ही पार्सल करून विक्री केल्या जात आहे. अनेकांचे संसार दारूमुळे उद्ध्वस्त झाले आहेत. दारु कुठे व कशी मिळते, हे गावातील लहान मुलांनाही माहिती आहे; मात्र बिटमधील जबाबदारी असलेले पोलीस व संबंधित विभागाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे हा अवैध दारू विक्रीचा गोरखधंदा राजरोस चालू आहे. अवैध दारू साठा गावांमध्ये मिळत आहे; मात्र बीट प्रमुखांचे याकडे दुर्लक्ष होत असून, ग्रामीण भागातील गावांना दारू विक्रीची सूट दिली की काय, अशी चर्चा होत आहे.

 

 त्यामुळे अवैध दारुचा साठा या छोट्याशा गावांमध्येही होत असताना दारुच्या आहारी तरुण मुले तरुण वयात येण्याच्या अगोदर दारुचे प्राशन करून अनेक संसार उघडे पडले असून, काही महिलांचे मुलं, पती व्यसनाधीन झाले आहेत. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नारांडा गावातील अवैध दारू विक्रीमु‌ळे होणाऱ्या रोजच्या किटकिटी, भांडण, तंटे व व्यर्थ खर्च, यामुळे गावातील महिला वैतागलेल्या आहे. दारूमुळे अल्पवयीन मुलेसुद्धा नशेच्या

आहारी जात आहेत. यामुळे मुलांच्या अभ्यासावर परिणाम होत असून त्यांच्या भविष्याच्या परिणामाबद्दल पालकांना चिंता आहे. या दारूमुळेच अनेक संसार उद्ध्वस्त होऊन अनेक संसार उद्ध्वस्तीच्या मार्गावर आहेत. महिलांनी आपली दैनंदिन कामे करायची व रात्री दारूमुळे घरातील माणसाच्या किटकिटी ऐकायच्या, या सर्व बाबीला कंटाळल्या. यामुळे कोरपना तालुक्यातील स्थानिक कोरपणा शहरातील महिला पोलीस स्टेशनला धडकल्या. या ठिकाणी ठाणेदार व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे गावातील दारू बंद करण्यासंदर्भात मागणी केली. या व्यतिरिक्त गावात कोण कोण दारू विकत आहे. याबद्दलही महिलांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले. कोरपना तालुक्यातील कोरपना येथे दारूचा अक्षरशः महापूर आला असल्याचे महिलांनी सांगितले. या ठिकाणी बिनधास्तपणे 

गावातील अवैध दारू विक्रीचा विषय अत्यंत गंभीर असून, याचा महिला व मुलांवर वाईट परिणाम होत आहे. दारूमुळे होणारे दुष्परिणाम बघता ग्रामसभेत ठराव घेऊ. गावातील 

दारू विक्रेते हे विक्री करत असून, कोणाचीही ऐकण्याच्या मनस्थितीत ते नाही व त्यांचे मनोबल खूप वाढले असल्याचे कोरपना येथील महिलांचे म्हणणे आहे. आपली व्यथा मांडण्यासाठी कोरपना पोलीस स्टेशनला आलेल्या महिलांसोबत पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली व लवकरच गावात येऊन अवैध दारू विक्रेत्यांचा बंदोबस्त करणार, असे सांगितले. यावेळी कोरपना येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

———————————–

महाराष्ट्र सरकारने गावातील पोलीस पाटलांना गावातील शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करण्याकरिता शासनाच्या मानधनावर पोलीस पाटलांची नियुक्ती केली मात्र गावातील अवैद्य व्यवसायांची माहिती पोलीस पाटील देतो की नाही? कुठे इथेही आर्थिक हितसंबंध जपले जात आहे, पोलीस पाटलांनी दिलेल्या अहवालात गावात कसल्याही प्रकारचे व्यवसाय नाही. असे लक्षात येते पोलीस पाटलांना मात्र न चुकता मानधन दिला जातो सर्व खर्च शासनाचा लाखो रुपयांचा आहे.

—————————————-

गावातील अवैध दारू विक्रीचा विषय अत्यंत गंभीर असून, याचा महिला व मुलांवर वाईट परिणाम होत आहे. दारूमुळे होणारे दुष्परिणाम बघता घरात कौटुंबिक व महीलाना मानसिक त्रास होतआहे सुट्टापट्टी तरूण पिडी .बर्बाद होते असून आर्थीक संकटामुळे आत्महत्या सारखे टोकेची भुमीका चिंतनीयआहे गावातील दारू कायमचीच बंद करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना यांना शिष्टमंडळासह भेट घेऊन अवैध व्यवसाय हद्दपारची मागणी करूण अन्यथा                             

       आंदोलन उभारु असा इशारा दिला आहे. 

 

 आबिद अली महाराष्ट्र प्रदेश सहसचिव राष्ट्रवादी काँग्रेस

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें