चाळीसगाव येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारकाचे मंत्री गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण !

चाळीसगाव येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारकाचे मंत्री गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण !

 

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) 

चाळीसगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे आज २४ रोजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या व अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण झाले, या प्रसंगी मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचे कार्य मोठे असून चाळीसगाव येथे उभारण्यात आलेल्या सुंदर स्मारकामुळे एक प्रेरणादायी वास्तू सर्वाना उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार मंगेश चव्हाण यांचे कौतुक केले. मात्र या स्मारकाच्या स्वच्छतेची जबाबदारी सर्व समाजाची असून त्याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात म्हटले की योग्य नेतृत्व, ठाम भूमिका आणि सकारात्मक शासन असेल तर अशक्य काहीच नाही. असे स्मारक म्हणजे केवळ इतिहासाचा सन्मान नाही, तर पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणेचं शिलालेख आहे. तरुणांना आवाहन आहे, ज्यांनी अंधार हटवला त्यांना आठवा, ज्यांनी माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवलं त्यांचा विचार जपा. ही मशाल पुढे नेणं आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. असे त्यांनी सांगितले

आमदार मंगेश चव्हाण यांनीही आपल्या मनोगताच्या माध्यमातून स्मारक उभारणीचा घटनाक्रम सांगितला, जाती पातीच्या पलीकडे जाऊन काम करणारा मी कार्यकर्ता असून चाळीसगाव शहरात विविध महापुरुषांचे स्मारक व चौक उभारणी करत असताना काही मंडळींनी फुले स्मारकाच्या मागणीच्या आडून समाजात विष पसरवण्याचे काम केले आज सर्वांच्या प्रयत्नांनी हे भव्य स्मारक पूर्ण झाले, स्मारक बांधून थांबायचे नाही तर फुले दांपत्याने जी शिक्षण वाट दाखवली त्यावर चालताना माझ्या स्वतःच्या हिंगोणे गावात ज्या जिल्हा परिषद शाळेत मी शिकलो तिला क्लस्टर मॉडेल स्कूल उभारून त्याला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जाहीर केले. यावेळी विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांच्यासह उद्धवराव महाजन, डॉ.संजय माळी, सचिन महाजन यांनीही मनोगत व्यक्त केली, 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन होते, याप्रसंगी व्यासपीठावर खासदार स्मिताताई वाघ, विधानपरिषद आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार साहेबराव घोडे, आजी माजी लोकप्रतिनिधीसह महात्मा फुले स्मारक समितीचे सदस्य व पदाधिकारी तसेच माळी समाज पदाधिकारी व तालुक्यातील फुले प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेश महाजन यांनी केले तर आभार रमेश सोनवणे यांनी मानले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें