प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वतःला  सिद्ध करण्याची सर्वांना समान संधी- मा. दिलीपसिंह भोसले 

प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वतःला  सिद्ध करण्याची सर्वांना समान संधी- मा. दिलीपसिंह भोसले 

 

फलटण प्रतिनिधी:”सहकार क्षेत्रातील सर्व कर्मचारी व संचालक यांना प्रशिक्षणाची आवश्यकता असून, प्रशिक्षणाच्या माध्यमातून  नेतृत्व गुण, कौशल्य गुण व व्यक्तिमत्व विकसित करून स्वतःला सिद्ध करण्याची सर्वाना समान संधी उपलब्ध होते.” असे मत सद्गुरु उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष मा. दिलीपसिंह भोसले यांनी प्रशिक्षण कार्यशाळेच्या अध्यक्षीय भाषांनामध्ये व्यक्त केले.

    श्री सद्गुरु हरिबुवा महाराज सहकार प्रशिक्षण सहकारी संस्था मर्यादित फलटण, यांच्यामार्फत 15 ऑगस्ट रोजी ‘श्रीराम बझार’ चे सर्व संचालक व कर्मचारी यांच्यासाठी बझारच्या मुख्य कार्यालय फलटण येथे एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

    एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे मा. जे.पी.गावडेसाहेब सहाय्यक निबंध सहकारी संस्था फलटण यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी गावडे साहेब म्हणाले, “सहकार क्षेत्राला अत्याधुनिक प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. आपल्या तालुक्याला श्री सद्गुरु हरिबुवा महाराज सहकार प्रशिक्षण सहकारी संस्था मर्यादित फलटण, या संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यशाळांच्या आयोजनासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. 

 

प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी पुणे येथील सुप्रसिद्ध प्रशिक्षक प्रा. डॉ. सचिन वाडेकर व प्रा. डॉ. सुनील धनगर यांनी योगदान दिले. नेतृत्व गुण, किमान कौशल्य, आत्मविश्वास, निर्णय अचूकता, निर्णय क्षमता, कामाचे नियोजन व कामातील उत्कृष्टता इ. विषयांवरती अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन व प्रशिक्षण दोन्ही तज्ञानी दिले. 

     याप्रसंगी श्रीराम बझारचे चेअरमन जितेंद्र पवार, व्हा. चेअरमन दिलीपसिंह भोसले,ज्येष्ठ संचालक महादेवराव पवार, सहकार प्रशिक्षण संस्थेचे  व्हा. चेअरमन जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ सर चेअरमन ऍड. शितल अहिवळे व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. शितल अहिवळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीराम बाजार चे जनरल मॅनेजर अनंत पाटीलसाहेब यांनी केले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें