अहिरे तालुका खंडाळा येथे ऋषिकेश अविनाश धायगुडे पाटील
अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन
कार्यक्रमास मंत्री,खासदार,आमदार तसेच विविध मान्यवर राहणार उपस्थित
खंडाळा प्रतिनिधी आबासो धायगुडे
खंडाळा तालुक्याचे युवा नेतृत्व ऋषिकेश अविनाश धायगुडे पाटील यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा सोमवार दिनांक १८ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता अहिरे येथे आयोजित करण्यात आलेला आहे.हा सोहळा खासदार छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
हा कार्यक्रम माजी आमदार मदन भोसले,सातारा जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके पाटील,भारतीय जनता पार्टी खंडाळाचे माजी तालुकाध्यक्ष अनिरुद्ध गाढवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.याप्रसंगी आमदार महेश शिंदे,आ.अतुल भोसले,माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,आ.मनोज घोरपडे,
आ.सचिन पाटील,माजी आमदार संग्राम थोपटे,भाजपचे माजी सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम,शिक्षणमहर्षी ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे, सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर,भाजपचे महिला सातारा जिल्हाध्यक्ष सुरभी भोसले,
भाजपचे युवा मोर्चा सातारा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी,
मा.जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय युवक काँग्रेस साताराचे विराज शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
उमा-माधव निवास अहिरे येथे हा कार्यक्रम संपन्न होणार असून कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन खंडाळा पंचायत समितीच्या माजी उपसभापती व सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य वंदनाताई अविनाश धायगुडे पाटील,युवा नेते अजय माधवराव धायगुडे पाटील आणि मा.अविनाश धायगुडे पाटील जनकल्याण प्रतिष्ठान खंडाळा तालुका यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.तसेच यावेळी मा.अविनाश धायगुडे पाटील अहिरे विकास सेवा सोसायटी अहिरे या नुतन इमारतीचा भुमीपुजन सोहळा घेण्यात आलेला आहे.मंत्री महोदय, खासदार,आमदार व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हे भूमिपूजन संपन्न होणार आहे.













