राखीचे पाकीटे स्वीकारण्यासाठी पोस्ट ऑफीसमध्ये स्वतंत्र यंत्रणा
सातारा प्रतिनिधी : भारतातील सर्व ठिकाणी राखी पाकिटांचे वितरण लवकरात लवकर होण्यासाठी सातारा टपाल विभागातर्फे राखी पाकिटे स्वीकारण्यासाठी खास स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये सातारा मुख्य डाकघर, सातारा सिटी, एम. आय. डी. सी. सातारा, संगमनगर, वाई, कोरेगाव, लोणंद, महाबळेश्वर, फलटण, पांचगणी या पोस्ट ऑफिस व्यतिरिक्त इतर ही ठिकाणी सदर राखी पाकिटे स्वीकारण्याची व्यवस्था केलेली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन वरिष्ठ अधिक्षक डाकघर यांनी केले आहे.
नागरिकांनी राखी पाकिटे ऑफिस मध्ये व्यवस्था केलेल्या पत्र पेट्या / ट्रे मध्ये टाकावी किंवा टपाल कर्मचारी यांच्याकडे द्यावीत. तसेच राखी साठी पोस्ट ऑफिसने तयार केलेल्या विशिष्ट कव्हरचाही उपयोग करावा व जलद गतीने पाठवण्यासाठी स्पीड पोस्ट सेवेचाही वापर करावा.
काही अडचण असल्यास पोस्ट ऑफिस मधील कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी. त्यामुळे आपली राखी पाकिटे लवकरात लवकर वितरण करता येतील. राखी पाकिटे स्वीकारणाऱ्याचा पत्ता पिनकोड व मोबाइल क्रमांकासह लिहावा. जेणेकरून राखी पाकिटांचे लवकरात लवकर वितरण होईल.













