मोर्वे विद्यालयातील विद्यार्थ्यांना टॅब चे वाटप

मोर्वे विद्यालयातील विद्यार्थ्यांना टॅब चे वाटप
खंडाळा प्रतिनिधी
गणेश गुरव
खंडाळा तालुक्यातील तीर्थक्षेत्र मोर्वे येथील माध्यमिक विद्यालय मोर्वे शाळेतील इयत्ता आठवी व नववी वर्गातील विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पुणे जेंडामार्क व कुका कंपनी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण 55 टॅबचे वाटप करण्यात आले
आधुनिक युगात शिक्षण प्रभावीपणे शिकवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पुस्तके, अभ्यास साहित्य, व्हिडिओ, शैक्षणिक गेम्स आणि इतर शैक्षणिक ॲप्स यांचा वापर करणे सोपे व्हावे या उद्देशाने टॅब चे वाटप जेंडामार्क कंपनीचे सीईओ हिमांशू जाधव, हेड ऑफ मार्केटिंग श्वेता मॅडम,एच आर हेड गणेश टिळेकर, कुका कंपनीचे सेल्स मॅनेजर कल्पेश पाटील, सुबोध पाटील, रोटरी क्लबचे प्रेसिडेंट श्री सुब्रोसेन, अश्विनी टोले, सिद्धी, शर्वरी, तृप्ती, ग्रामपंचायत सरपंच सुवर्णा काशीद, सदस्या लीलावती धायगुडे, गुरुदत्त ज्ञानपीठ संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी जगताप, मा सचिव रघुनाथ जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी गुरूकृपा पतसंस्थेचे चेअरमन श्री मल्हारी जगताप, पोलीस पाटील राहुल धायगुडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा राजश्री जाधव ,सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत जगताप, बाळासो शेरे मुख्याध्यापक प्रशांत गुळदगड,वाठार विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल मोहिते, शाळा व्यवस्थापन सदस्य,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी,पालक , महिला व मोर्वे ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब डिंबळे यांनी केले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें