अमित मनेळ चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक

अमित मनेळ चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) : – 

चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदी अखेर अमित मनेळ यांची आज १ रोजी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी आज मंगळवार १ जुलै रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. तत्कालीन पोलीस निरीक्षक किरण कुमार काबाडी यांची अचानक तडफातडफी बदली झाल्याने तेंव्हापासून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पद अनेक दिवस रिक्त होते, परंतु शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचा चार्ज हा चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या कडे सोपविला होता. आता अमित मनेळ यांच्या रूपाने चाळीसगाव पोलिस स्टेशनला पूर्णवेळ कारभारी मिळाले आहे. अमित मनेळ हे यापूर्वी नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक पदावर कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी गुन्हे शोध, कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांना आता चाळीसगाव येथील कायदा-सुव्यवस्था अबाधीत राखण्याचे मोठे आवाहन असणार आहे. दरम्यान स्थानिक नागरिक, व्यापारी, विविध संघटना व सामाजिक तसेच राजकिय कार्यकर्त्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें