उत्तरकाशी उत्तराखंड येथे गेलेले पर्यटक सुरक्षीत
सातारा दि. 2 : उत्तराखंड जिल्हा उत्तरकाशी येथे काल दि. ३०.०६.२०२५ रोजी सिलाईबंद या ठिकाणी अतिवृष्टिमुळे चारधाम रस्ता वाहून गेला असल्याने, भारतातले ७७७ पर्यटक अडकले असून एनडीआएफ, एसडीआरएफ, पोलीस व महसूल विभागाचे कर्मचारी येथे तैनात करण्यात आले असून रस्ता पूर्ववत करण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे.
सध्या जानकीचट्टी या ठिकाणी सर्व पर्यटक सुरक्षित आहेत. सदर ठिकाणी डॉक्टर, भोजन व राहण्याची व्यवस्था उत्तराखंड सरकारने केली आहे, तसेच भुस्खलन भागातून चालत मार्गस्थ करून पुढे वाहनातून ऋषिकेश पर्यंत उत्तराखंड सरकार व्यवस्था करण्यात येणार असल्याचे दुरध्वनीवरून कळाले. जानकी चट्टी हा भाग दुर्गम असल्याने नेटवर्क संपर्क साधण्यास अडथळा होत असल्याने वायरलेस सेटने संपर्क चालू आहे अधिक माहिती उपलब्ध झाल्यास कळवण्यात येईल.
अधिक माहितीसाठी संपर्क क्र.- SEOC UTTARAKHAND -०१३५-२७१०३३४, DEOC उत्तरकाशी ७३९०९१३१२९ / ९४११११२९७६/ SHO – गंभीर तोमर ७५००५१२०१०/District Magistrate UttarKashi ०१३७४-२२२२८०/JOINT CEO SEOC UTTARAKHAND -9927699151













