कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपाचे उदघाट्न व 1000 मे. टन गोदामच्या बांधकामाचा शुभारंभ रविवारी विविध मान्यवरांच्या उपस्थित होणार संपन्न
फलटण प्रतिनिधी: कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचा 5 पेट्रोल पंप कृषीदेव पेट्रोलियम तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून 1000 मे. टन साठवणूक क्षमता असलेल्या गोदाम बांधकामाचा शुभारंभ तरडगाव ता. फलटण येथे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते रविवार दिनांक 22 /06/ 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता संपन्न होणार आहे .यावेळी माजी आमदार दिपकराव चव्हाण सातारा जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती फलटणचे मा. सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर ,गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचे संचालक श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, विभागीय कार्यालय कोल्हापूरचे उपसरव्यवस्थापक मा . डॉ. सुभाष घुले ,असिस्टंट सेल्स मॅनेजर शिखर श्रीवास्तव सातारा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी श्रीराम सह. साखर कारखाना, फलटणचे चेअरमन बाळासाहेब शेंडे ,फलटण तालुका सह दूध संघ संघ, फलटणचे चेअरमन धनंजय पवार, वसंतराव गायकवाड ,शंकरराव माडकर , सौ.रेश्मा भोसले, धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, भीमदेव बुरुंगले, सौ रेखा खरात ,रमेशकाका बोंद्रे ,नितीन शा. भोसले दिलीपराव अडसूळ ,सुभाष गायकवाड ,सौ द्रोपदा नरोटे, राजेंद्र गायकवाड उपस्थित राहणार आहेत.
तरी तरडगाव पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर, व्हा. चेअरमन भगवानराव होळकर, सेक्रेटरी शंकरराव सोनवलकर, सहाय्यक निबंधक सह .संस्था,फलटण ,जिजाबा पांडुरंग गावडे यांनी केले आहे.













