फलटण येथे युवकाचा खून करून त्याचा गुप्तभाग कापुन चारीत पुरून ठेवलेला खूनाचा गंभीर गुन्हा ३६ तासाचे आत उघड करुन दोन आरोपींना अटक.
सातारा प्रतिनिधी:
दिनांक १०/०६/२०२५ रोजी सायंकाळी ५.३० वा. पासून ते दिनांक ११/०६/२०२५ रोजीचे सकाळी ११.३० वा.चे दरम्यान मौजे ठाकुरकी ता. फलटण जि. सातारा येथील पंधरकी नावचे शिवारात कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन इसम नामे संदीप मनोहर रिटे रा. ठाकुरबुवा मंदीराशेजारी, ठाकुरकी, ता. फलटण जि. सातारा याचे शरीरावर गंभीर मारहाण करुन त्याचे गुप्तभाग कापुन त्याचा खून केल्याबाबत फिर्यादीने तक्रार दिल्याने फलटण शहर पोलीस ठाणे गुरनं २१५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), २३८ प्रमाणे दिनांक ११/६/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची घटना अतिशय गंभीर स्वरूपाची असल्याने श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री राजीव नवले उप विभागीय पोलीस अधिकारी सातारा यांनी अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे , शाखा सातारा यांना गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे अरुण देवकर पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांनी पोलीस उप निरीक्षक विश्वास शिंगाडे व पोलीस अंमलदार अमोल माने, अजित कर्णे, जयवंत खांडके, स्वप्निल दौंड, वैभव सावंत यांचे तपास पथक तयार करुन गुन्हा उघड करण्याच्या सुचना देवून तपासकामी फलटण शहर पोलीस ठाण्यास पाठविण्यात आले होते.
सदर पथकाने फलटण येथे जावून गुन्हयाच्या घटनास्थळास भेट देवून तेथील परिस्थितीची माहिती घेवून पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे फलटण शहर पोलीस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदार यांचे समवेत तपास केला असता घटनास्थळावर मिळुन आलेला मृतदेह हा संदीप मनोहर रिटे रा. ठाकुरबुवा मंदीर शेजारी, ठाकुरकी, ता. फलटण जि. सातारा याचा असल्याची खात्री झाली तसेच तो दिनांक १०/०६/२०२५ रोजी सकाळी कामावर गेला होता तेव्हा पासुन तो परत घरी आला नसल्याची माहिती मिळुन आली. तपास पथकाने घटनास्थळावर हजर राहुन सर्वप्रथम आजुबाजुचे साक्षीदार यांच्याकडे विचारपुस करून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला परंतु घडले प्रकाराबाबत काही एक माहिती मिळुन येत नव्हती. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने तपास पथक सर्वतोपरी प्रयत्न करीत होते.
दिनांक १२/०६/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनिय गोपनिय बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली की, फलटण शहरामधील मच्छी मार्केट येथे दिनांक १०/०६/२०२५ रोजी सायंकाळी मयत संदीप रिटे व अज्ञात इसमाचा मोबाईल घेतल्याच्या कारणावरून वाद झाला होता त्या अज्ञात इसमाने मयत संदीप याचा मोबाईल काढुन घेवुन तो तेथुन निघुन गेला होता. त्याचे पाठोपाठ मयत संदीप रिटे हा देखील गेला असल्याची खात्रीशीर बातमी प्राप्त झाली. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोउपनि विश्वास शिंगाडे यांचे तपास पथकाने वेशांतर करून त्यांच्या तपासाची दिशा ठरवुन तांत्रिक विश्लेषण व गोपनिय बातमीदार यांचे जाळे तयार करून त्या अज्ञात इसमाचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेतले. त्या इसमाकडे गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याच्या चुलतभावाच्या सांगण्यावरून, साडेपाच लाख रूपयांची सुपारी ठरवुन संदीप रिटे याला जीवे मारल्यावर पैसे देण्याच्या अटीवर गुन्हा केला असल्याची कबुली दिलेली आहे. अशा प्रकारे स्थानिक गुन्हे शाखेकडील व फलटण शहर पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर खूनाचा गंभीर गुन्हा दाखल झाल्यापासून २४ तासाचे आत उघड करून आरोपी नामे
१) मंगेश उर्फ मोन्या सचिन मदने, वय २१ वर्षे, रा. बोडरेवस्ती, ठाकुरकी ता. फलटण जि. सातारा
२) सोमनाथ माणीक मदने, वय ३२ वर्षे रा. बोडरेवस्ती, ठाकुरकी ता. फलटण जि. सातारा यांना अटक केली आहे.
सदर कारवाईमध्ये श्री तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री राजीव नवले उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा, बाळासाहेब भालचीम, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, हेमंतकुमार शहा, पोलीस निरीक्षक, फलटण शहर पोलीस स्टेशन, सहायक पोलीस निरीक्षक, नितीन नम, नितीन शिंदे, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, गोपाल बदने, पोलीस अंमलदार मोहन नाचण, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, अमोल माने, अजित कर्णे, जयवंत खांडके, मुनिर मुल्ला, हसन तडवी, सनी आवटे, अजय जाधव, अमित झेंडे, अमृत कर्पे, पंकज बेसके, शिवाजी भिसे, प्रवीण कांबळे, स्वप्निल दौंड, केतन शिंदे, रविराज वर्णेकर, प्रवीण पवार, वैभव सावंत, दलजीत जगदाळे, फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार अनिल बारेला, बापुराव धायगुडे, राजेंद्र नाळे, नितीन सजगणे, सचिन भोसले, चंद्रकांत धापते, जितेंद्र टिके, काकासो कर्णे, सचिन पाटोळे, गणेश अवघडे, निखील गायकवाड, अतुल बडे महिला पोलीस अंमलदार राणी फाळके, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांनी कारवाई मध्ये सहभाग घेतला











