काळज येथून अल्पवयीन मुलाचे अपहरण; लोणंद पोलिसांनी केली सुटका

काळज येथून अल्पवयीन मुलाचे अपहरण; लोणंद पोलिसांनी केली सुटका

लोणंद प्रतिनिधी 

लोणंद येथील आयटीआय मधे शिकत असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याचे काळजच्या चौकात पाचजणांकडून अपहरण करण्यात आलेले त्याची लोणंद पोलीसांनी रात्री पावणे अकराच्या दरम्यान सुटका केली. याबाबत लोणंद पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार लोणंद येथील आयटीआय मधे शिकत असलेला जिंती ता फलटण येथील १७वर्षीय अल्पवयीन मुलास मित्राच्या मोटारसायकलवरून घरी जात असताना साखरवाडी येथील पाचजणांकडून संध्याकाळी ५ वाजता काळज येथील तडवळे फाट्याजवळ स्पीड ब्रेकरपाशी गाडी हळू झाल्याचा फायदा घेत अडवून जबरदस्तीने उतरवून दोन दुचाकीवरून आलेल्या पाचजणांकडून जबरदस्तीने अपहरण करण्यात आले.

सदर अपहरणाची माहिती मिळताच लोणंदचे सपोनि सुशील भोसले पोलीस हवा. विठ्ठल काळे. बापू मदने यांच्या टिमने अपहरणाचा शोध घेण्यास सूरूवात केली आरोपींनी पोलिसांपासून वाचण्यासाठी वानेवाडी. कोराळे. लाटे. खुंटे. होळ असा फिरत पोलिसांच्या भीतीने शेवटी खुंटे येथे संबंधित अल्पवयीन मुलास सोडून दिले पोलिसांकडून तिथे पोहोचत रात्री पावणे अकरा वाजता त्याचा ताबा घेतला

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें